-
क्रिकेट जगातत असे काही क्रिकेटपटू आहेत ज्यांनी स्वत:चा देश सोडून दुसऱ्या देशासाठी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. संधी न मिळाल्यामुळे किंवा जास्त प्रमाणात संधी न मिळाल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे.
-
न्युझिलंडचा क्रिकेटपटू कोरी एंडरसन हा खेळाडू २०१४ साली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मात्र स्वत:च्या देशाच्या टीममध्ये चांगली संधी न मिळाल्यामुळे त्याने तीन वर्षांसाठी अमेरिका लीग क्रिकेटसोबत करार केला होता. नंतर तीन वर्षांसाठी एंडरसन अमेरिकेसाठी खेळला होता.
-
उन्मुक्त चंद या क्रिकेटपटूने भारतीय संघाकडून अनेक सामने खेळले आहेत. मात्र पुढे संधी न मिळाल्यामुळे तो ऑस्ट्रेलियात गेला. येथे तो बॅश लीगमध्ये क्रिकेट खेळत राहिला.
-
हॉंगकॉंग टीमचा खेळाडू अंशुमन रथने २०१८ साली आशिया कपमध्ये भारताविरोधात जोरदार फलंदाजी केली होती. त्यानंतर मात्र तो भारताकडे वळला. पुढे तो महाराष्ट्रातील नागपूरच्या टीमकडून डोमॅस्टिक क्रिकेट खेळत राहिला.
-
उस्मान कादीर वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून डोमॅस्टिक क्रिकेट खेळलेला आहे. मात्र त्याचा परिवार पाकिस्तानमध्ये राहत होता. याच कारणामुळे पाकिस्तामध्ये परतून तो पाकिस्तानी संघाकडून खेळला.
-
सामी अस्लम हा क्रिकेपटू मुळचा पाकिस्तानचा आहे. त्याने पाकिस्तानी टीमकडून १३ कसोटी सामने खेळले. मात्र नंतर संधी न मिळाल्यामुळे तो अमेरिकेत गेला. येथे तो डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये खेळत राहिला.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं