-
आयपीएल ही क्रिकेटमधील सर्वात मोठी लीग आहे. आयपीएलमध्ये खेळावं हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. काहींना ही संधी मिळते, तर काहींचं स्वप्न अपूर्ण राहतं. असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय सामने खेळले पण त्यांना आयपीएलमध्ये केवळ एकच सामना खेळण्याची संधी मिळाली. सुप्रसिद्ध पाकिस्तानी क्रिकेटपटू युनूस खानलाही आयपीएलमध्ये केवळ एकच सामना खेळता आला. युनूस खान २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सकडून एकमेव सामना खेळला आहे.
-
बांगलादेशचा डावखुरा फिरकीपटू अब्दुर रझाकने आपल्या कारकिर्दीत अनेक सामने खेळले आहेत. पण त्याला आयपीएलमध्ये एकदाच संधी मिळाली. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकमेव सामना खेळला आहे.
-
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एंड्रे नेल यानं २००८ मध्ये मुंबई इंडियन्सकडून दिल्लीविरुद्ध एक सामना खेळला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली होती.
-
बांगलादेश संघाचा माजी कर्णधार मशरफे मुर्तझा हा देखील आयपीएलमध्ये एकच सामना खेळला आहे. तो २००९ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून एक सामना खेळला आहे.
-
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॅडिनने २०११ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून एक आयपीएल सामना खेळला होता. हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध होता.
-
ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलमधील महत्त्वाच्या खेळाडू मानला जातो. पण त्याचा भाऊ डॅरेन ब्राव्होला आयपीएलमध्ये केवळ एकच संधी मिळाली आहे. डॅरेन ब्राव्होनं २०१७ मध्ये कोलकाता संघाकडून एकमेव सामना खेळला होता.
-
श्रीलंका संघाचा ऑफस्पिनर अकिला धनंजया याने २०१२ मध्ये मुंबई इंडियन्सकडून एक सामना खेळला होता. हा सामना दिल्ली विरुद्ध होता. यामध्ये अकिलाने ४ षटकात ४७ धावा दिल्या होत्या, त्यानंतर त्याला पुन्हा संधी मिळाली नाही. (सर्व छायाचित्रे: सोशल मीडिया)

Pahalgam Terror Attack: पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तानच्या मुसक्या आवळण्यासाठी मोदी सरकारचे पाच मोठे निर्णय