-
जगात अनेक सुंदर महिला क्रिकेटपटू आहेत. याच सर्वात सुंदर दिसणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे पाकिस्तानची अष्टपैलू क्रिकेटपटू कायनात इम्तियाज.
-
क्रिकेटपटू कायनात इम्तियाज नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
-
कायनातने आपल्या प्रियकरासोबत ३० मार्च २०२२ रोजी लग्नगाठ बंधली.
-
या लग्नसोहळ्यातील खास फोटो कायनातने आता सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
क्रिकेटच्या मैदानावर कायनातने खास फोटोशूट केले आहे.
-
लाल रंगाचा भरजरी लेहेंगा परिधान करत हातात बॅट घेऊन हटके फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटची सध्या सोशल मीडियावर प्रंचड चर्चा होत आहे.
-
देशभरातून कायनातवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
-
हे ‘क्रिकेट थीम’ फोटोशूट अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.
-
१७ जुलै २०२० रोजी कायनातचा साखरपुडा पार पडला होता.
-
अनेक महिला क्रिकेटपटू आपल्या खेळाने आणि सौंदर्याने क्रिकेटला ‘ग्लॅमरस टच’ देताना दिसत आहेत.
-
३० वर्षीय सौंदर्यवती कायनातचा जन्म २१ जून १९९२ ला कराचीमध्ये झाला.
-
२००५ साली कायनातने झुलन गोस्वामीला सगळ्यात पहिल्यांदा क्रिकेट खेळताना पाहिलं.
-
यावेळी मैदानातली झुलनची कामगिरी पाहून कायनातने क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.
-
झूलनची भेट घेतली तेव्हा कायनात केवळ १४ वर्षांची होती.
-
केवळ झुलन गोस्वामीचं नाही तर भारताची माजी क्रिकेटपटू अंजुम चोप्राबद्दलही कायनातला तितकाच आदर आहे.
-
कायनातने २०१० साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यातून आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
-
कायनात भारतीय क्रिकेट आणि कर्णधार विराट कोहलीही खूप मोठी चाहती असल्याचे सांगितलं जातं.
-
विराटच्या फलंदाजीचे कायनातने सोशल मीडियावर कौतुकही केले होते.
-
कायनातला पाकिस्तानच्या संघाकडून फारशी संधी मिळाली नाही.
-
(सर्व फोटो सौजन्य : कायनात इम्तियाज / इन्स्टाग्राम)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं