-
इंडियन प्रीमियर लीग २०२२ च्या मोसमात बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स संघाने शानदार विजय मिळविला. (फोटो सौजन्य – IPL)
-
बुधवारी झालेल्या सामन्यात लखनऊच्या संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा २ धावांनी पराभव केला. हा सामना अतिशय रोमांचक होता. (फोटो सौजन्य – IPL)
-
सामन्याचा हिरो ठरला लखनऊ संघाचा यष्टिरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक, ज्याने ७० चेंडूत नाबाद १४० धावा केल्या. (फोटो सौजन्य – IPL)
-
डी कॉकला सामनावीर म्हणून त्याचे बक्षीस मिळाले. (फोटो सौजन्य – IPL)
-
ज्या क्षणी डी कॉकने शतक पूर्ण केले, तो क्षण त्याच्यासाठी आणखीनच खास ठरला. (फोटो सौजन्य – IPL)
-
खरं तर, डी कॉकने आपले शतक पूर्ण करताच, स्टँडमध्ये बसलेली त्याची पत्नी शाशाने आपल्या ४ महिन्यांच्या मुलीला ‘बाहुबली’ चित्रपटाप्रमाणे दोन्ही हात हवेत उंच करून आनंद व्यक्त केला (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
शाशाने पांढऱ्या रंगाचे तर मुलीने गुलाबी रंगाचे कपडे घातले होते. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
दक्षिण आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉक ७ जानेवारी रोजी पिता झाला. त्याची पत्नी शाशा हिने एका मुलीला जन्म दिला. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
डाव्या हाताचा फलंदाज डी कॉकने त्याच्यासोबत मुलगी आणि पत्नीचा फोटो शेअर केला होता (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
डी कॉकने आपल्या मुलीचे नाव कियारा ठेवले आहे. (फोटो सौजन्य – @CricCrazyJohns)
-
डी कॉकने आपल्या मुलीच्या जन्माच्या एक आठवडा आधी म्हणजे ३१ डिसेंबर रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. (फोटो सौजन्य – ट्विटर)
-
भारतीय संघ आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेदरम्यान त्याने निवृत्तीची घोषणा केली होती. (फोटो सौजन्य – IPL)
-
यावेळी मेगा लिलावात लखनऊच्या संघाने डी कॉकला विकत घेतले. (फोटो सौजन्य – IPL)
-
या यष्टिरक्षक फलंदाजासाठी फ्रँचायझीने ६.७५ कोटी रुपयांची बोली लावली होती. (फोटो सौजन्य – IPL)
-
डी कॉकने या मोसमात आतापर्यंत १४ सामने खेळले असून त्यात त्याने ५०२ धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य – IPL)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”