-
आयपीएलचे १५ वे पर्व शेवटच्या टप्प्यात आहे. या हंगामात काही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली आहे, तर काही खेळाडू यावेळी आपली कमाल दाखवू शकलेले नाहीत.
-
आयपीएलमध्ये ज्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आहे, त्यांना नंतर भारतीय संघात स्थान मिळालेले आहे.
-
याच निमित्ताने आयपीएलमध्ये आतापर्यंत ५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
-
शिखर धवन हा खेळाडू आयपीएलध्ये सर्वात यशस्वी राहिलेला खेळाडू आहे. तो आतापर्यंत मुंबई इंडियन्स, दिल्ली डेअरडेव्हिल्स, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स या संघांकडून खेळलेला आहे.
-
या हंगामात शिखर धवन पंजाब किंग्ज या संघाकडून खेळत असून त्याने आतापर्यंत २०१२, २०१६, २०१९, २०२१ या पर्वामध्ये ५०० पेक्षा जास्त धावा केलेल्या आहेत.
-
केएल राहुलने या हंगामात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. त्याने आयपीएलच्या पदार्पणातच ६५९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढच्या वर्षी त्याने ५९३ धावा केल्या.
-
२०२० सालच्या हंगामामध्ये राहुलने ६७० तर २०२१ साली त्याने ६२६ धावा केल्या होत्या. या वर्षीदेखील तो ५०० पेक्षा जास्त धावा करण्याची दाट शक्यता आहे.
-
विराट कोहलीने आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहेत. २०११ साली त्याने पहिल्यांदाच ५०० पेक्षा जास्त धावा केल्या. त्यानंतर २०१३ साली त्याने ६३४ धावा केल्या.
-
२०१५ साली कोहलीने ५०५ धावा केल्या. तर २०१६ साली त्याने रेकॉर्डब्रेक अशा ९७३ धावा करुन सर्वांनाच चकित केले. २०१८ सालच्या आयपीएल पर्वामध्ये त्याने ५३० धावा केल्या आहेत.
-
डेविड वॉर्नरनेही आयपीएलमध्ये चांगला खेळ करुन दाखवलेला आहे. त्याने २०१४ ते २०२० या सलग सहा वर्षात ५२८,५६२, ८४८, ६४१, ६९२, ५४८ अशा धावा केल्या होत्या.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ