-
इंडियन प्रीमर लीग आपल्या शेवट्या टप्प्यामध्ये येऊन पोहचले आहे. या सीझनमध्ये काही अशा खेळाडूंचा जलवा बघायला मिळाला ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊयात अशा काही खेळाडूंबद्दल
-
भारताचा माजी कर्णधार एम.एस धोनीने २०२० साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सन्यास घेतला. मात्र, त्याने आयपीएलमध्ये खेळणे चालूच ठेवले आहे. धोनीने २०२२ च्या आयपीएलमध्ये १४ सामने खेळले असून २३२ धावा काढल्या आहेत.
-
साऊथ अफ्रिकेचा पूर्व कर्णधार फाफ डु प्लेसिस रॉयलचैलेंजर्स बेंगळूरुचा कर्णधार आहे. बंगरुळू संघ प्ले ऑफमध्ये पोहचला आहे.
-
प्लेसिसने आत्तापर्यंत १४ सामन्यामध्ये ४४३ धावा काढल्या आहेत. ३७ वर्षीय प्लेसिसने फेब्रुवारी २०२१ नंतर कोणतेही आंतराष्ट्रीय सामने खेळले नाहीत.
-
कॅरेबियन अष्टपैलू खेळाडू किरॉन पोलार्डने IPL 2022 च्या मध्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. पोलार्डने मुंबई इंडियन्स संघासाठी आयपीएल २०२२ मध्ये एकूण ११ सामने खेळले आहेत. या सामन्यात त्याने १४४ धावांसोबत ४ विकेटही घेतले आहेत.
-
ड्वेन ब्राव्हो हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. ब्राव्होने आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी १० सामन्यामध्ये १६ विकेट घेतल्या आहेत. ब्राव्होने २०२१ च्या टी२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. -
फिरकी गोलंदाज सुनील नरेनने ऑगस्ट २०१९मध्ये वेस्ट इंडिजकडून आंतरराष्ट्रीय सामना खेळला. नरेन आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स (KKR) संघाचा भाग आहे. IPL २०२२ मध्ये सुनील नरेनने १४ सामन्यामध्ये ९ विकेट घेतल्या आहेत.
-
न्नई सुपर किंग्सचा फलंदाज रॉबिन उथप्पाने आयपीएल २०२२ मध्ये १२ सामने खेळले. ज्यामध्ये त्याने दोन अर्धशतकांसह २३० धावा काढल्या आहेत.
-
३६ वर्षीय रॉबिन उथप्पाने जुलै २०१५ मध्ये भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता.

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?