-
आयपीएलमध्ये अनेक अनकॅप्ड म्हणजेच म्हणजेच कोणत्याही आंतरराष्ट्रीय क्रिकेट फॉरमॅटमध्ये न खेळलेलेल्या खेळाडूंनी कमाल करुन दाखवली आहे. त्यांची गोलंदाजी आणि फलंदाजीपाहून अनेकजण भारावून गेले आहेत. यातील काही खेळाडूंनी शतकी खेळी करुन दाखवलेली आहे.
-
आयपीएलच्या २००८ सालच्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळणार शॉन मार्शने राजस्थानविरोधात खेळताना ११५ धावा केल्या. त्याने ही खेळी ६९ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि सात षटकार लगावत ही धावसंख्या उभारली होती.
-
मनिष पांडे या क्रिकेटपटूने आयपीएल २००९ च्या हंगामात १९ वर्षांचा असताना ७३ चेंडूंमध्ये दमदार शतक झळकावले होते. त्याने दहा चौकार आणि चार षटकार लगावले होते.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना देवदत्त पडिक्कलने आयपीएल २०२१ मध्ये ५२ चेंडूंमध्ये १०१ धावा केल्या होत्या. या शतकी खेळामध्ये त्याने ११ चौकार आणि सहा षटकार लगावले होते.
-
पॉल वाल्थॅटी या क्रिकेटपटूने आयपीएलच्या २०११ च्या पर्वात पंजाब किंग्जकडून खेळताना धमाकेदार शतक झळकावले होते. त्याने ६३ चेंडूंमध्ये १९ चौकार आणि दोन षटकार लगावत १२० धावा केल्या होत्या.
-
रजत पाटीदारने आयपीएल २०२२मध्ये अवघ्या ५४ चेंडूंमध्य ११२ धावा केल्या आहेत. ही शतकी खेळताना त्याने १२ चौकार आणि एक षटकार लागवला.

पत्नी, मुलासमोर दहशतवाद्यांनी डोंबिवलीतील पर्यटकाच्या डोक्यात गोळ्या झाडल्या, मुलावर वडिलांचा मृतदेह पाहण्याची वेळ