-
IPL 2022: यंदाच्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात मुंबई इंडियन्सला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले आहे.
-
एकूण १४ साखळी सामन्यातील १० सामने गमावल्यामुळे मुंबई इंडियन्स गुणतालिकेच्या सर्वात तळाला रहावे लागले आहे.
-
स्पर्धेतील आव्हान पूर्णपणे संपुष्टात आल्याने मुंबई इंडियन्सचे खेळाडू आता आपापल्या घरी परतले आहेत.
-
रोहित शर्मा २०११ मध्ये मुंबई इंडियन्स संघाशी जोडला गेला होता.
-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा सध्या पत्नी आणि मुलीसोबत सुट्टीवर गेला आहे.
-
दोन महिने आयपीएल खेळल्यानंतर सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी रोहित शर्मा मालदीवला गेला आहे.
-
या मालदीव ट्रिपचे अनेक फोटो रोहितने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
मालदीव हे स्वच्छ, निर्मळ आणि मन मोहून टाकणाऱ्या सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी जगभर प्रसिद्ध आहे.
-
या फोटोंमध्ये रोहित पत्नी रितिका सजदेहसोबत वेळ घालवताना दिसत आहे.
-
रोहितच्या या फोटोंवर लाइक्सचा वर्षाव होत आहे.
-
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : रोहित शर्मा / इन्स्टाग्राम)

‘बाया माझ्या बांगुऱ्या मांगतान रं’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक