-
आयपीएलचा पंधरावा हंगाम नुकताच संपला आहे. या पर्वात अनेक नवख्या खेळाडूंनी चांगली कामगिरी केली असून दिग्गजांना मागे टाकले आहे.
-
आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर अनेक खेळाडूंना राष्ट्रीय क्रिकेट टीममध्ये संधी मिळते.
-
यावेळीदेखील अनेक नव्या आणि चांगला खेळ दाखवण्याऱ्या खेळाडूंना दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेमध्ये संधी देण्यात आली आहे. या मालिकेत कोणकोणत्या खेळाडूंवर लक्ष राहील यावर एक नजर टाकुया.
-
आयपीएल २०२२ पर्वात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा कर्णधार केएल राहुल चांगलाच तळपळा. तो या हंगामात सर्वात जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसऱ्या क्रमाकांवर आहे. त्याने ५०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
-
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला यावेळी विश्रांती देण्यात आली असून दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व केएल राहुल करेल. त्यामुळे या मालिकेत तो काय कामगिरी करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
-
हार्दिक पांड्याने नेतृत्व केलेल्या गुजरात टायटन्स संघाने आयपीएल २०२२ पर्वातील जेतेपद पटकावले. हार्दिकने या हंगामात गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात चांगली कामगिरी करुन दाखवली.
-
त्यामळे दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेमध्ये हार्दिक पांड्या आपला हा खेळ कायम ठेवणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळणाऱ्या दिनेश कार्तिक या फलंदाजाने आयपीएलच्या या हंगामात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्याने अनेकवेळा संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे.
-
दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेत दिनेश कार्तिक आपला हा फॉर्म कायम ठेवणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
-
अर्शदीप सिंगने आयपीएलच्या या हंगामात दिमाखदार कामगिरी केली. त्याने पंजाब किंग्ज संघाकडून खेळताना अटीतटीची लढत सुरु असताना त्याने संघासाठी चांगला खेळ केला.
-
याच कामगिरीमुळे अर्शदीप सिंगला दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेसाठी भारतीय संघात स्थान देण्यात आले आहे. यावेळीही तो चांगला खेळ करेल अशी अपेक्षा आहे.
-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात सर्वाधिक चर्चा झाली ती सनरायझर्स हैदरबाद संघाकडून खेळणाऱ्या उमरान मलिक या वेगवान गोलंदाजाची. त्याने या हंगामात फास्टेस्ट डिलिव्हरी ऑफ मॅचचा अवॉर्ड कित्येक वेळा जिंकला. या कामगिरीमुळे उमरान मलिकला भारतीय संघात स्थान देण्यात आले असून यावेळीही अशीच नेत्रदीपक कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

Indian Students In US: अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी ५० टक्के भारतीयांचा व्हिसा रद्द, “सरकार दखल घेणार का?” काँग्रेसचा प्रश्न