-
आयपीएल क्रिकेटनंतर आता भारतीय क्रिकेटपटू दक्षिण आफ्रिकेविरोधातील टी-२० मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ही मालिका भारतातच खेळवली जाणार आहे.
-
या मालिकेमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रित बुमराह आणि मोहम्मद शमीसारखे वरिष्ठ खेळाडू दिसणार नाहीत. तरीदेखील भारतीय संघ परिपूर्ण वाटतोय.
-
यावेळी भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आले आहे. भारतीय संघात केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (उपकर्णधार) (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, आर बिश्नोई, भुवनेश्वर, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंग, उमरान मलिक या खेळाडूंचा समावेश आहे.
-
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना हा ९ जून रोजी दिल्ली येथे खेळवला जाणार आहे.
-
तर दुसरा सामना १२ जून रोजी कटक येथे, तिसरा सामना १४ जून रोजी विशाखापट्टनम येथे खेळवला जाणार आहे.
-
चौथा सामना १७ जून रोजी राजकोट येथे तर पाचवा सामना १९ जून रोजी बंगळुरु येथे खेळवला जाणार आहे.
-
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामने पाहण्यासाठी प्रतिव्यक्ती ८५० ते १४००० रुपयांपर्यंतचे तिकीट आहे.
-
हे सामने स्टार स्पोर्ट नेटवर्कवर प्रसारित केले जातील. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार गोल्ड 2 चॅनेलवर हे सामने पाहता येतील.
-
तसेच डिस्ने प्लस हॉटस्टारवदेखील हे सामने पाहता येतील.

Deenanath Mangeshkar Hospital: “दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या अहवालाला महत्त्व नाही”, गर्भवतीच्या मृत्यूबाबत रुपाली चाकणकरांची मोठी प्रतिक्रिया