-
टीम इंडियाचा आक्रमक सलामीवीर पृथ्वी शॉ सध्या त्याच्या मैदानावरील कामगिरीबरोबरच कथित गर्लफ्रेण्डमुळेही चर्चेत आहे.
-
पृथ्वी शॉ आणि अभिनेत्री प्राची सिंग गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
२०२० मध्ये प्राचीने पृथ्वी शॉच्या इन्स्टाग्राम पोस्टवर कमेंट केली होती. तेव्हा हे दोघे पहिल्यांदा चर्चेत आले होते.
-
नंतर दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना फॉलो करण्यास सुरुवात केली.
-
पृथ्वी शॉ आणि प्राची सिंग अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर लाईक आणि कमेंट करायचे.
-
त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटमुळे दोघेही डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.
-
परंतु, अचानक त्यांनी एकमेकांना इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपबद्दलच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
पृथ्वी शॉमुळे चर्चेत आलेली प्राची मुळची मुंबईची आहे.
-
२२ एप्रिल १९९५ रोजी प्राचीचा जन्म झाला.
-
२०१९ मध्ये प्राचीने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली.
-
छोट्या पडद्यावरील ‘उडान’ मालिकेत वंशिका शर्माची भूमिका तिने साकारली होती.
-
अभिनयासोबतच प्राचीला डान्सचीदेखील आवड आहे.
-
प्राची बेली डान्सिंगचे व्हिडीओ सोशल मीडियावरून शेअर करत असते.
-
प्राची सिंग इन्स्टाग्रामवर २०० जणांना फॉलो करते.
-
या यादीत पृथ्वी शॉदेखील होता.
-
पृथ्वी शॉचे इन्स्टाग्रामवर १.४ मिलियन फॉलोअर्स असून तो २४५ जणांना फॉलो करतो.
-
दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. (सर्व फोटो : पृथ्वी शॉ,प्राची सिंग/ इन्स्टाग्राम)
-
(सर्व फोटो : पृथ्वी शॉ,प्राची सिंग/ इन्स्टाग्राम)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड