-
भारताचा माजी कर्णधार आणि फलंदाज विराट कोहली सध्या भलताच फॉर्ममध्ये आहे.
-
विराट कोहली त्याच्या मैदानीवरील धडाकेबाज खेळासाठी ओळखला जातो.
-
गेल्या काही काळापासून विराटला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.
-
आपल्या आयपीएलमधील कामगिरीवरही तो फारसा खूश नव्हता.
-
विराट कोहली सध्या खराब कामगिरीमुळे विश्रांती घेत आहे.
-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पुढील टी २० मालिकेत विराट खेळणार नाही.
-
परंतु, असं असलं तरी मैदानाबाहेर विराटची क्रेझ कायम आहे.
-
विराटच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.
-
नुकतंच विराटने इन्स्टाग्रामवर २०० मिलियन फॉलोवर्सचा टप्पा गाठला आहे.
-
त्यामुळे इन्स्टाग्रामवर सर्वात जास्त फॉलोअर्स असलेल्या जागतिक स्तरावरील खेळाडूंच्या यादीमध्ये विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
स्वत: विराटने पोस्ट करून याबाबत माहिती दिली.
-
२० कोटींहून अधिक फॉलोअर्स असलेला तो जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
-
विराट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची कमाई करतो.
-
एका इन्स्टाग्राम पोस्टसाठी विराट कोहलीला पाच कोटी रुपये मिळतात.
-
इन्स्टाग्रामच्या माध्यमातून इतकी कमाई करणारा तो पहिला भारतीय खेळाडू आणि जगातील १९वा सेलिब्रिटी आहे. (सर्व फोटो : विराट कोहली /इन्स्टाग्राम)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य