-
ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करत सुवर्णपदकावर नाव कोरणारा भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
-
भालाफेकपटू नीरज चोप्राने एक नवीन विक्रम आपल्या नावावर केला आहे.
-
फिनलॅण्डमधील पावो नूरमी गेम्स २०२२ (Paavo Nurmi Games 2022) मध्ये नीरजने भालाफेक करत नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे.
-
या स्पर्धेत अवघ्या १० सेकंदात ८९.३० मीटर दूर भालाफेक करत नीरजने रौप्य पदकाची कमाई केली आहे.
-
विशेष म्हणजे नीरजने स्वत:चाच विक्रम मोडत नवा राष्ट्रीय रेकॉर्ड रचला आहे.
-
याआधी मागील वर्षी त्याने पतियालामध्ये ८८.०७ मीटर दूर भाला फेकत राष्ट्रीय विक्रम केला होता.
-
त्यानंतर नीरजने ७ ऑगस्ट २०२१ रोजी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं.
-
आता पावो नूरमी गेम्समध्ये ८९.३० मीटर दूर भालाफेक केल्याने नीरजने नवा विक्रम केला आहे.
-
नीरज चोप्रा हा पावो नूरमी गेम्समध्ये सहभाग घेणारा एकमेव भारतीय स्पर्धक आहे.
-
टोक्यो ऑलिम्पिकनंतर भालाफेकपटू नीरजची ही पहिलीच स्पर्धा आहे.
-
या स्पर्धेनंतर नीरज फिनलॅण्डमधील ‘कुओर्तने गेम्स’मध्ये आणि डायमंड लीगच्या ‘स्टॉकहोम लेग’मध्ये सहभागी होणार आहे.
-
पुढील महिन्यात होणाऱ्या ‘जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप’ आणि ‘राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धां’मध्येही नीरजकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. (सर्व फोटो : नीरज चोप्रा/ इन्स्टाग्राम)

‘एमपीएससी’च्या इतिहासात पहिल्यांदाच २७९५ जागांसाठी जाहिरात, ‘या’ पदवीधरांना अर्जाची संधी…