-
एजबस्टन येथे झालेल्या निर्णायक कसोटी सामन्या भारतीय संघाला पराभवचा सामना करावा लागला.
-
या सामन्यात भारतीय संघातील अनेक खेळाडूंना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
-
सर्वात मोठा अपेक्षाभंग माजी कर्णधार विराट कोहलीकडून झाला. त्याने पहिल्या डावात फक्त ११ तर दुसऱ्या डावात २० धावा केल्या.
-
मधल्या फळीची जबाबदारी असलेला श्रेयस अय्यर दोन्ही डावात झटपट बाद झाला.
-
दुसऱ्या डावात तर इंग्लंडचा प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने खेळाडूंना सुचना देऊन अय्यरला सहज जाळ्यात अडकवले.
-
भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गीलदेखील चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरला.
-
‘लॉर्ड’ असे टोपननाव मिळालेला शार्दुल या सामन्यात फक्त एक बळी मिळवू शकला.
-
फलंदाजीचा विचार केला तर दोन्ही डावांत तो एकेरी धावसंख्येवर बाद झाला.
-
वन डाऊनला येणारा हनुमा विहारी मिळालेल्या संधीचा फायदा घेऊ शकला नाही. (सर्व फोटो सौजन्य – ट्वीटर)

११ मार्च पंचांग: महादेवाच्या कृपेने मिथुन, कर्क राशीला विविध मार्गे होणार लाभ; तुमच्या आयुष्यात होणार का नवे बदल? वाचा राशिभविष्य