-
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेली तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशा फरकाने जिंकली.
-
टी २० मालिकेपाठोपाठ एकदिवसीय मालिकेतही यजमानांना भारताकडून पराभव स्वीकारावा लागला.
-
निर्णायक सामन्यात ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले.
-
यष्टीरक्षक ऋषभ पंतने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले.
-
त्याने चौफेर फटकेबाजी करत नाबाद १२५ धावांची खेळी केली.
-
५५ चेंडूत ७१ धावा करून हार्दिक पंड्याने त्याला मोलाची साथ दिली.
-
हार्दिक पंड्याने गोलंदाजीमध्येही चार बळी घेऊन चमकदार कामगिरी केली.
-
क्षेत्ररक्षणामध्ये ‘सर’ रविंद्र जडेजाने आपली कमाल दाखवली.
-
रीस टॉपली हा इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने भारताचे तीन गडी बाद केले.
-
कर्णधार जोस बटलरने अर्धशतकी खेळी करून इंग्लंडच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला होता.
-
भारताने मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माला इतर खेळाडूंनी शॅम्पेनने अक्षरश: आंघोळ घातली.
-
इंग्लंडमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी करणारा रोहित तिसरा कर्णधार ठरला आहे. (सर्व फोटो सौजन्य – आयसीसी/बीसीसीआय ट्विटर)

Today’s Horoscope : शुक्रवारी ‘या’ तीन राशींना लाभेल सुख-समृद्धी; तुम्हाला परिघ योग देणार का कष्टाचे फळ? वाचा राशिभविष्य