-
कसोटी क्रिकेट हा क्रिकेटचा सर्वात जुना प्रकार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंच्या क्षमतेचा खरा कस लागतो असे मानले जाते.
-
क्रिकेटच्या या प्रकारामध्ये काही खेळाडूंनी असे विक्रम प्रस्थापित केले आहेत की ते भविष्यात कधी मोडले जातील की नाही याबाबत शंकाच आहे.
-
श्रीलंकेचा माजी गोलंदाज मुथय्या मुरलीधरनला फिरकीचा जादुगार म्हटले जाई.
-
त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ८०० बळी घेतलेले आहेत. सध्याचा एकही खेळाडू त्याच्या जवळपासही नाही.
-
ब्रायन लाराला वेस्ट इंडीज क्रिकेटला पडलेलं सोनेरी स्वप्न म्हटलं जातं.
-
त्याने एकाच कसोटी डावामध्ये वैयक्तिक ४०० धावा करण्याचा विक्रम केलेला आहे.
-
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये एक अद्वितीय विक्रम केलेला आहे.
-
कसोटी कर्णधार म्हणून त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल सात द्विशतके झळकावलेली आहेत.
-
मार्क बाऊचरला कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकांपैकी एक मानले जाते.
-
त्याने यष्टीमागे ५५५ फलांदाजांना बाद केले आहे. हा विक्रम कधी मोडेल असे वाटत नाही. (सर्व फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी कर्णधार अशी रिकी पाँटिंगची ओळख आहे. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
-
एक कसोटी खेळाडू म्हणून त्याने १०८ विजय बघितले आहेत. (फोटो सौजन्य – सोशल मिडीया)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”