-
विराट कोहली त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. अनेकांकडून त्याच्या फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असले तरी कमाईच्या बाबतीत विराट कोहली पुढे आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार विराट कोहली हा आशियातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू आहे.
-
एका रिपोर्टनुसार विराट कोहलीला एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८.६९ कोटी रुपये मिळतात. (पीसी-इन्स्टाग्राम)
-
विराट कोहलीच्या पुढे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आहे. मेस्सी एका इंस्टाग्राम पोस्टसाठी १४ कोटी रुपये घेतो. मेस्सीच्या एका पोस्टची कमाई विराट कोहलीच्या तुलनेत साडेपाच कोटींनी जास्त आहे. (पीसी-इन्स्टाग्राम)
-
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो इन्स्टाग्राम पोस्टमधून सर्वाधिक कमाई करतो. रोनाल्डोला एका इंस्टाग्राम पोस्टसाठी १९ कोटी रुपये मिळतात. रोनाल्डोची कमाई विराट कोहलीपेक्षा दुप्पट आहे. (पीसी-इन्स्टाग्राम)
-
क्रिस्टियानो रोनाल्डोचे इंस्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स आहेत. रोनाल्डोला ५३ कोटींहून अधिक लोक फॉलो करतात.
-
मेस्सीला ३४ कोटींहून अधिक लोक फॉलो करतात. त्याचबरोबर विराट २० कोटींहून अधिक फॉलोअर्ससह जगात १७व्या क्रमांकावर आहे. (पीसी-इन्स्टाग्राम)
‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”