-
ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचा कर्णधार पॅट कमिन्स विवाहबद्ध झाला आहे.
-
पॅटने त्याची दीर्घकाळापासूनची गर्लफ्रेंड बेकी बोस्टनशी लग्न केले.
-
पॅट कमिन्सने सोमवारी (१ ऑगस्ट) सोशल मीडियावर चाहत्यांना याबाबत माहिती दिली.
-
विशेष म्हणजे पॅट आणि बेकी लग्नाअगोदच एका मुलाचे पालकदेखील झाले आहेत.
-
आपल्या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्याने ‘जस्ट मॅरीड’ अशी घोषणा केली.
-
२९ वर्षीय पॅट कमिन्स सध्या ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचा कर्णधार आहे आणि जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे.
-
पॅट कमिन्स आणि बेकी गेल्या आठ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत.
-
२०२० मध्येच दोघांनी एंगेजमेंट केली होती. कोरोना व्हायरसमुळे त्यांचे लग्न पुढे ढकलण्यात आले.
-
नोव्हेंबर २०२१मध्ये बेकीने मुलाला जन्म दिला. त्याचे नाव एल्बन असे ठेवण्यात आले आहे.
-
बेकी बोस्टन मूळची इंग्लंडची असून ती एक इंटेरिअर डिझायनर आहे.
-
पॅट कमिन्सने लग्नाची माहिती शेअर केल्यावर त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला.
-
आयपीएलमधील पॅट कमिन्सचा संघ कोलकाता नाईट रायडर्सनेही सोशल मीडियावरून अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. (सर्व फोटो सौजन्य – पॅट कमिन्स इन्स्टाग्राम)

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स