-
२०२२ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघाला रौप्य पदक मिळाले.
-
भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून ९ धावांनी पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
-
असे असले तरी भारतीय महिला संघाने राष्ट्रकुल स्पर्धेतील क्रिकेटमध्ये पहिल्याच वर्षी चमकदार कामगिरी केली.
-
भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सुवर्णपदकाच्या सामन्यात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या.
-
हरमनप्रीत कौरने स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली आहेत.
-
भारतीय संघाची सलामीवीर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना राष्ट्रकुल स्पर्धेत तिसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे.
-
तिने पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली होती.
-
भारताच्या या कामगिरीमध्ये वेगवान गोलंगदाज रेणूका सिंग ठाकूरचे मोठे योगदान आहे. तिने पाच सामन्यात ११ बळी घेतले आहेत.
-
जेमिमाह रॉड्रिग्ज ही भारतासाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू ठरली आहे. जेमिमाहने ५ सामन्यांत एका अर्धशतकासह १४६ धावा केल्या. (सर्व फोटो सौजन्य – ट्विटर)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”