-
इंग्लंडमधील बर्मिंगहॅम शहरात २२वी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा थाटात पार पडली.
-
एकूण ६१ पदकांसह भारत पदकतालिकेमध्ये चौथ्या स्थानावर राहिला.
-
बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूसह काही खेळाडूंनी स्पर्धेत एका पेक्षा जास्त पदकांची कमाई केली.
-
स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी सिंधूने सुवर्णपदकाची कमाई करून आपल्या पदकांची हॅट्ट्रीक केली.
-
भारताच्या लक्ष्य सेनची ही पहिलीच राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होती.
-
त्याने पहिल्याचवर्षी एक वैयक्तीक सुवर्ण आणि एक सांघिक पदकावर आपले नाव कोरले.
-
टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमलने तर चार पदकांवर आपले नाव कोरले.
-
वैयक्तीक सुवर्णपदकासह त्याने विविध प्रकारांमध्ये एकूण चार पदकांची कमाई केली.
-
टेबल टेनिसपटू जी साथियान याने देखील शरथ कमलच्या पावलावर पाऊल ठेवले आहे.
-
साथियानने पुरुष दुहेरीत रौप्य आणि एकेरीत कांस्यपदक जिंकले.
-
स्क्वॅशपटू सौरव घोषालने राष्ट्रकुल स्पर्धेत दोन पदके पटकावली.
-
त्याने मिश्र दुहेरीत दीपिका पल्लीकलसह कांस्य आणि एक वैयक्तीक कांस्य पदक जिंकले. (सर्व फोटो सोजन्य – ट्विटर)
Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”