-
संपूर्ण देश आज स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत आहे. देशातील प्रत्येक व्यक्ती स्वातंत्र्यदिनाच्या जल्लोषात मग्न आहे. भारतीयांनी सगळीकडे आपली ताकद सिद्ध केली आहे. यापूर्वी भारतीय जवानांनी ब्रिटिशांच्या भूमीवर तिरंगा फडकावला होता. बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतीय जवानांनी देशाची ताकद दाखवून दिली. नीरज चोप्राने याआधी ऑलिम्पिक, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये देशाचं नाव रोशन केलं होतं.
-
२० वर्षीय वेटलिफ्टर अचिंता शेउलीने ७३ किलो वजनी गटात राष्ट्रकुल विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. तो भारतीय लष्करात हवालदार आहे. (पीटीआय)
-
बॉक्सर अमित पंघलने राष्ट्रकुल स्पर्धेत ५१ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. ते भारतीय सैन्यात सुभेदार आहेत. (पीटीआय)
-
१९ वर्षीय जेरेमी लालरिनुंगा याने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्समध्ये वेटलिफ्टिंगमध्ये देशासाठी सुवर्णपदक जिंकले. जेरेमी हे भारतीय लष्करात नायब सुभेदार या पदावर बारमेर येथे कार्यरत आहेत. त्याला आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटमध्ये प्रशिक्षण देण्यात आले.
-
कुस्तीपटू दीपक पुनियाने २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला ८६ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवून दिले, ते भारतीय सैन्यात सुभेदार आहे. (एएफपी)
-
अॅथलेटिक्समध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देणारे नीरज चोप्रा हे भारतीय लष्करात सुभेदार आहेत. गेल्या महिन्यातच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने रौप्यपदक जिंकले होते. मात्र, दुखापतीमुळे तो २०२२ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भाग घेऊ शकला नाही.
Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश