-
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय क्रिकेटमधील दोन महत्त्वाचे खेळाडू आहेत.
-
विराट कोहली भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार आहे.
-
रोहित शर्माकडे सध्या भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी आहे.
-
रोहित शर्मा आणि विराट कोहली हे निःसंशयपणे आधुनिक क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी आहेत.
-
दोघांचा ताळमेळ आणि एकमेकांवर असलेला विश्वास अनेकदा चर्चेचा विषय ठरतो.
-
विराट कोहलीला ‘रनमशीन’ म्हणून ओळखले जाते.
-
अनेक विक्रम नावावर असूनही विराट कोहलीसाठी रोहित शर्माचे काही विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे.
-
रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५०पेक्षा जास्त षटकार ठोकलेले आहेत.
-
विराट कोहली रोहितच्या या कामगिरीपासून फार दूर आहे. त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये १२५ षटकार ठोकलेले आहेत.
-
रोहितची एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २६४ अशी आहे.
-
आतापर्यंत विराट कोहलीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतक करता आलेले नाही.
-
१८३ ही विराटची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
-
मुंबई इंडियन्सचा कर्णधार असलेला रोहित आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे.
-
त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईने पाच आयपीएल विजेतेपदं पटकावली आहेत.
-
विराट कोहलीला मात्र, एकही आयपीएल विजेतेपद मिळवता आलेले नाही. (फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस/ ट्विटर)
‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”