-
भारताचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री वर्मा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत.
-
धनश्री आणि युजवेंद्र चहलमध्ये बिनसलं असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
-
इन्स्टाग्रामवर धनश्रीने तिच्या नावातून चहल काढून टाकल्यानंतर आणि युजवेंद्रने ‘नवीन आयुष्याची सुरूवात’ असं लिहिलेली स्टोरी डिलिट केल्यानंतर या चर्चा सुरू झाल्या.
-
परंतु, आता यावर स्पष्टीकरण देत युजवेंद्रने इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे या चर्चांना पूर्णविराम देण्याची विनंती केली आहे.
-
स्टोरीमध्ये “माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे की, माझ्या नात्यासंबंधी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. कृपया त्याला पूर्णविराम द्या. सर्वांना प्रेम,” असं चहलने म्हटलं आहे.
-
युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने डिसेंबर २०२०मध्ये लग्नगाठ बांधली.
-
करोना काळात लॉकडाऊन दरम्यान एका ऑनलाईन क्लासमध्ये दोघे एकमेकांना भेटले.
-
त्यानंतर युजवेंद्र चहल आणि धनश्री एकमेकांच्या प्रेमात पडले. तीन महिने डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
-
युजवेंद्र आणि धनश्री दोघेही सोशल मीडियावर फारच सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
-
इतर सेलिब्रिटी जोडींप्रमाणे युजवेंद्र-धनश्री जोडीही लोकप्रिय आहे.
-
धनश्री पेशाने डेन्सिट्स आहे. याशिवाय ती उत्तम डान्सर आणि कोरिओग्राफर आहे.
-
युजवेंद्र-धनश्रीचे डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात.
-
टीममधील क्रिकेटर्ससहचे डान्स व्हिडीओ धनश्री शेअर करत असते.
-
धनश्री सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सरही आहे. तिचं स्वत:चं युट्यूब चॅनेलही आहे.
-
धनश्रीचा चाहता वर्गही मोठा आहे. तिचे युट्यूबवर २.६४ मिलियन तर इन्स्टाग्रामवर ५.२ मिलियन फॉलोवर्स आहेत.
-
युजवेंद्र-धनश्रीच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या असल्या तरी सोशल मीडिया अकाऊंटवर ते एकमेकांना अजूनही फॉलो करतात.
-
(सर्व फोटो : धनश्री वर्मा, यजुवेंद्र चहल/ इन्स्टाग्राम)

Aaditya Thackeray : “दीनानाथ मंगेशकर रुग्णालय कोण चालवतंय? मुख्यमंत्र्यांना…”, आदित्य ठाकरेंच्या ‘त्या’ पोस्टमुळे चर्चेला उधाण