-
“सचिन माझा चांगला मित्र आहे. त्याने माझी खूप मदत केली आहे पण, मी त्याच्याकडून फार अपेक्षा नाही ठेवू शकत”, असे विनोद कांबळी म्हणाला आहे.
-
यावरून सचिन तेंडुलकर आणि विनोद आजही एकमेकांना चांगले मित्र मानत असल्याचे दिसते.
-
वयाच्या दहाव्या वर्षी शारदाश्रम विद्यामंदिर शाळेपासून सचिन आणि विनोदच्या मैत्रीची सुरुवात झाली होती.
-
दोघांनी रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे प्रशिक्षण घेतले.
-
असे म्हटले जाते की दोघेही शाळेत असताना वडापाव खाण्याची स्पर्धा करायचे.
-
‘हॅरिस शील्ड टूर्नामेंट’ स्पर्धेत दोघांनी विक्रमी ६६४ धावांची भागीदारी केली होती.
-
त्यानंतर दोघांनाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली.
-
२००० मध्ये दोघांच्या मैत्रीमध्ये दरी निर्माण झाल्याचे वृत्त आले होते.
-
मात्र, पुस्तक प्रकाशन सोहळा आणि आचरेकर सरांच्या अंत्यविधीदरम्यान दोघांची मैत्री शाबुत असल्याचे दिसले. (सर्व फोटो इंडियन एक्सप्रेसवरून साभार)

२२ वर्षीय विद्यार्थिनीने १८ कोटींमध्ये अभिनेत्याला विकलं कौमार्य; कारण सांगत म्हणाली, “अनेक मुली…”