-
क्रिकेटमध्ये अनेक विक्रम बनलेले आणि तुटलेले तुम्ही पाहिले असतील. (Photo : Indian Express)
-
खेळाडूंचे विश्व विक्रमांभोवती फिरते, परंतु क्रिकेट विश्वात असे काही विचित्र रेकॉर्ड आहेत जे फार कमी लोकांना माहित आहेत. (Photo : AP)
-
इतके वर्ष हे रेकॉर्ड कोणीही मोडू शकलेले नाही. त्यामध्ये असे काही तथ्यही आहेत जे तुम्ही यापूर्वी कधीही वाचले नसतील. (Photo : AP)
-
भारताचे माजी फलंदाज सुनील गावस्कर यांच्या नावावर कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर सर्वाधिक वेळा बाद होण्याचा विक्रम आहे. (Photo : Indian Express)
-
सुनील गावसकर कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर ३ वेळा बाद झाले आहेत. आतापर्यंत हा विक्रम कोणीही मोडू शकलेले नाही. (Photo : Indian Express)
-
भारताच्या सर्वात यशस्वी फलंदाजांमध्ये सुनील गावस्कर यांचे नाव येते. (Photo : Indian Express)
-
वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. (Photo : AP)
-
कसोटी सामन्याच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारणारा तो एकमेव फलंदाज आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. (Photo : AP)
-
गेलने २०१२ मध्ये बांगलादेशविरुद्ध ही कामगिरी केली होती. (Photo : Reuters)
-
इंग्लंडचा गोलंदाज जिम लेकरने कसोटी सामन्यात १९ बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. (@FXMC1957/Twitter)
-
सौरव गांगुली यांच्या नावावरही एक न ऐकलेला विक्रम आहे. (Indian Express)
-
सौरव गांगुली हे क्रिकेट इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्यांनी एकदिवसीय सामन्यांमध्ये सलग चार वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. (Indian Express)
-
१९९७ मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत त्यांनी सलग चार सामनावीर पुरस्कार जिंकले. (PTI)
-
शाहिद आफ्रिदीने ३७ चेंडूत ११ षटकार आणि ६ चौकार मारून त्यावेळी सर्वात जलद शतक करण्याचा विश्वविक्रम केला. (AP)
-
पण तुम्हाला माहित आहे का की या मॅचमध्ये आफ्रिदीने सचिन तेंडुलकरच्या बॅटचा वापर केला होता. (Photo : PTI)
-
खरंतर आफ्रिदीकडे योग्य बॅट नव्हती, म्हणून वकार युनूसने त्याला सचिनची बॅट खेळायला दिली. (Photo : Reuters)

