-
येत्या २७ ऑगस्टपासून आशिया चषकाला सुरुवात होणार आसून २८ ऑगस्ट रोजी भारत-पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघ आमनेसामने येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या दोन्ही संघांमध्ये याअगोदर झालेल्या वादावर नजर टाकुया.
-
भारत-पाकिस्तान खेळाडूंमध्ये पहिला वाद १९७८ साली जफर अली स्टेडियमवर झाला होता. यावेळी पाकिस्तानच्या सरफराज नवाज या गोलंदाजाने अंशुमन गायकवाड या भारतीय फलंदाजाला सलग चार बाऊंसर चेंडू फेकले होते. यामुळे रागावून भारतीय संघाने सामना अर्धवट सोडला होता.
-
भारत-पाक संघामध्ये दुसरा वाद ऑस्ट्रेलियामध्ये १९९२ सालच्या वर्ल्ड कपदरम्यान झाला होता. यावेळी भरतीय यष्टीरक्षक किरन मोरे आणि पाकिस्तानी फलंदाज मियँदाद यांच्यात वाद झाला होता. यावेळी मियँदादने मैदानावर रागात उंच उड्या मारायला सुरुवात केली होती.
-
भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंमध्ये १९९६ सालच्या वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान वाद झाला होता. यावेळी पाकिस्तानी फलंदाज अमीर सोहेल याने भारतीय गोलंदाज व्यंकटेशने फेकलेल्या चेंडूवर चौकार लगावत त्याला बोट दाखवले होते.
-
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर व्यंकटेशने अमीरला बाद करत अगदी तशाच पद्धतीने बोट दाखवीले होते. त्यावेळी या खेळाडूंमध्ये वाद पेटला होता.
-
या दोन्ही संघांच्या खेळाडूंमध्ये २००३ सालीदेखील वाद झाला होते. या सामन्यात हरभजन सिंग आणि मोहोम्मद युसुफ एकमेकांना मारायला धावले होते.
-
२००७ साली भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि शाहीद आफ्रिदी यांच्यात वाद झाला होता. धावपट्टीवर धावताना आफ्रिदी गौतम गंभीरच्या मध्ये आला होता.
