-
भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण लवकरच त्याच्या पहिल्या मोठ्या प्रोजेक्ट ‘कोब्रा’मधून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. (Instagram : irfanpathan_official)
-
३१ ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार्या या चित्रपटात इरफान प्रसिद्ध दक्षिण भारतीय अभिनेता चियान विक्रम आणि केजीएफ फेम श्रीनिधी शेट्टी यांच्यासोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. (Instagram : irfanpathan_official)
-
तथापि, अभिनयात हात आजमावणारा इरफान हा पहिला क्रिकेटपटू नाही, असे अनेक क्रिकेटर्स आहेत ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे. (Instagram : irfanpathan_official)
-
मैदानावरील आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखले जाणारे सुनील गावस्कर यांनी काही चित्रपटांमध्येही काम केले आहे. (Instagram : gavaskarsunilofficial)
-
‘लिटिल मास्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुनील गावस्कर यांनी ‘सावली प्रेमाची’ नावाच्या मराठी चित्रपटात काम केले होते. नंतर, १९८८ मध्ये नसीरुद्दीन शाह यांच्या ‘मालामाल’ चित्रपटातही त्यांनी छोटी भूमिका केली. (Instagram : gavaskarsunilofficial)
-
१९८३ साली भारताला विश्वचषक जिंकवून देणारे कपिल देव यांना आपण सर्वच ओळखतो. त्यांनी इक्बाल, मुझे शादी करोगी आणि स्टम्प्डसह काही चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या आहेत. (Instagram : therealkapildev)
-
नंतर, कपिल यांच्या जीवनावर बायोपिक ’83’ बनवण्यात आला, ज्यामध्ये रणवीर सिंग मुख्य भूमिकेत होता. (Instagram : therealkapildev)
-
मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे कारकिर्दीवर पडदा पडण्यापूर्वी, अजय जडेजा ९० च्या दशकात भारतीय क्रिकेट संघातील एक प्रमुख खेळाडू होता. (Instagram : travelermaan)
-
२००३ मध्ये क्रिकेटनंतर जडेजाने अभिनयात हात आजमावला, पण ‘खेल’ नावाचा त्याचा चित्रपट अशाप्रकारे आपटला की तो पुन्हा समालोचक बनला. (Instagram : travelermaan)
-
ब्रेट ली या प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाने क्रिकेटच्या मैदानावर मोठ्या यशाची चव चाखली आहे. (Instagram : brettlee_58)
-
तथापि, त्यांच्या ‘अनइंडियन’ चित्रपटाने सरासरी कामगिरी केल्यामुळे चित्रपटांमध्ये त्यांची वाटचाल तितकीशी संस्मरणीय नव्हती. (Instagram : brettlee_58)
-
अहवालानुसार, लीचा हा पहिला चित्रपट नव्हता. त्याने आधीच ‘बेबे’ नावाच्या चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. (Instagram : brettlee_58)

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं