-
Asia Cup 2022 : रविवारी पार पडलेला भारत-पाकिस्तान सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने धडाकेबाज कामगिरी केली.
-
हार्दिकने तीन बळी आणि नाबाद ३३ धावांची खेळी करत विजयी षटकार ठोकला.
-
भारत-पाकिस्तान सामन्यात त्याने केलेल्या उत्तम कामगिरीचं सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
-
कालच्या सामन्यानंतर पुन्हा चर्चेत आलेला हार्दिक पंड्या लक्झरियस आयुष्य जगतो.
-
मार्च २०२२ मध्ये बीसीसीआयकडून पुरविण्यात आलेल्या माहितीनुसार हार्दिक पंड्या भारतीय क्रिकेट संघातील ‘क’ श्रेणीतील क्रिकेटर आहे.
-
त्याला बीसीसीआयकडून वर्षाला एक कोटी रुपये मानधन मिळते.
-
याशिवाय पंड्या आयपीएलमधूनही कोटी रुपये कमवतो.
-
मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या पंड्या यंदा पार पडलेल्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्व केले होते.
-
यासाठी त्याला १५ कोटींचे मानधन देण्यात आले होते.
-
याशिवाय जाहिराती आणि ब्रॅण्ड एडरॉसमेण्टमधूनही पंड्या लाखो रुपये कमवतो.
-
पंड्या एकूण १० मिलियन डॉलर म्हणजे भारतीय रुपयानुसार ६७ कोटी संपत्तीचा मालक आहे.
-
माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार त्याचं वार्षिक उत्पन्न १५ कोटींहून अधिक आहे.
-
हार्दिकचा गुजरातमध्ये फ्लॅट आहे. याची किंमत सुमारे दोन कोटींच्या घरात आहे.
-
याशिवाय हार्दिक आणि कृणाल या दोघांनी काही महिन्यांपूर्वीच मुंबईत ३० कोटी किंमतीचा आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे.
-
हार्दिककडे लॅम्बोर्गिनी, ऑडी, मर्सिडिज, रेंज रोव्हर या महागड्या गाड्या आहेत. त्याची एकूण किंमत १.५ कोटी इतकी आहे.
-
याशिवाय त्याच्याकडे प्रायव्हेट जेटही आहे.
-
हार्दिकने २०२० मध्ये अभिनेत्री नताशा स्टॅनकोविकशी लग्नगाठ बांधली.
-
त्यांना अगस्त्य नावाचा गोड मुलगा आहे.
-
नुकताच हार्दिक फॅमिली व्हॅकेशनला गेला होता. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
-
(सर्व फोटो : हार्दिक पंड्या/ इन्स्टाग्राम)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?