-
‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ क्रिकेट स्पर्धेमध्ये बुधवारी भारताने हाँगकाँगवर ४० धावांनी मात करत ‘सुपर ४’ मधील आपलं स्थान पक्कं केलं आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने हा विजय मिळवला आहे.(फोटो: संग्रहित फोटो)
-
सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने त्याच्यासमोर झुकत कौतुक केलं. कोहलीची ही प्रतिक्रिया सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.(फोटो: ट्विटर)
-
विराट कोहलीने दिलेल्या या प्रतिक्रियेवर नेटकऱ्यांनी ”दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए…” अशा प्रकारच्या कमेंट द्यायला सुरुवात केली आहे.(फोटो: ट्विटर)
-
खरं तर २०२० च्या आयपीएल दरम्यान सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली आमने-सामने आले होते. या सामना दरम्यान सूर्यकुमार यादवच्या खेळीमुळे मुंबईला हा सामना जिंकता आला होता. सामना जिंकल्यावर मैदानात विराट कोहलीने सूर्यकुमार यादवकडे डोळे वटारून पहिले होते.(फोटो: ट्विटर)
-
त्यानंतर ‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ सामन्यात सूर्यकुमारची खेळी पाहून विराट कोहलीने झुकत केलेल्या कौतुकावर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे.(फोटो: ट्विटर)
-
‘आशिया चषक ट्वेन्टी-२०’ मुंबईकर सूर्यकुमारने मैदानाच्या चारही कोपऱ्यांत फटकेबाजी केली. त्याने २६ चेंडूंत सहा चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने नाबाद ६८ धावांची खेळी साकारली.(फोटो: ट्विटर)
-
तर, विराटने ४४ चेंडूंत एक चौकार आणि तीन षटकारांच्या साहाय्याने नाबाद ५९ धावांची केली. सूर्यकुमार-विराट जोडीने सात षटकांतच ९८ धावांची भर घातली.(फोटो: ट्विटर)
-
विशेष म्हणजे, सूर्यकुमार यादवने मारलेल्या एकूण सहा षटकारांपैकी चार षटकार शेवटच्या षटकात मारले आणि आपलं अर्धशतक पूर्ण केलं.(फोटो: ट्विटर)

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”