-
दुबईत सध्या आशिया चषक स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत आता साखळी सामन्यातील शेवटचा सामना पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग यांच्या आज (शुक्रवारी) होणार आहे.
-
या पैकी जो संघ जिंकेल तो सुपर ४ मध्ये सहभागी होईल. ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या हॉंगकॉंग विरुद्धच्या सामन्यात भारताने ४० धावांनी विजय मिळवत सुपर ४ मध्ये आपले स्थान निश्चित केले होते.
-
दरम्यान, सुपर ४ च्या सामन्यांना काही दिवस वेळ असल्याने भारतीय क्रिकेटपटूंनी गुरुवारी (१ सप्टेंबर) दुबईच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टीचा आनंद घेतला.
-
यावेळी भारतीय खेळाडूंना सर्फिंग आणि बीच व्हॉलीबॉल खेळताना दिसले.
-
भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख फलंदाज विराट कोहली राफटींगचा आनंद घेतला.
-
तर अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी समुद्र किनारी बसून वेळ घालवला.
-
भारतीय संघाचा हा व्हिडीओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत ट्वीटर खात्यावरून ट्वीट केला.
-
या व्हिडीओला When #TeamIndia hit ?.?.?.?.?.?! ? Time for some surf, sand & beach volley! ?, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
-
सुट्टीचा दिवस असल्याने राहुल द्रविड सरांनी ठरवले की आपण काही आगळंवेगळं करावं. आम्ही खूप मजा केली. प्रत्येकजण आनंदी आणि उत्साही होता, अशी प्रतिक्रिया यझुर्वेंद्र चहलने या व्हिडीओत दिली.
-
भारत सुपर ४चा पहिला सामना रविवारी (४ सप्टेंबर) दुबईत खेळणार आहे. परंतु भारताचा सामना कोणाशी असेल हे आज पाकिस्तान विरुद्ध हॉंगकॉंग सामन्यानंतर निश्चित होईल.
-
पाकिस्तानच्या तुलनेत हाँगकाँगचा संघ थोडा दुबळा आहे. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तान जिंकण्याची शक्यता जास्त आहे.
-
त्यामुळे आशिया चषकात भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. या पूर्वी झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला होता.

ऐश्वर्या राय सकाळी किती वाजता उठते? जाणून घ्या तिची संपूर्ण दिनचर्या