-
४ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाला ५ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. (AP)
-
यावेळी भारतीय गोलंदाजांनी अतिशय निराशाजनक कामगिरी केली.
-
याशिवाय अशी काही कारणे होती, ज्यामुळे भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कारणे कोणती आहेत ते जाणून घेऊया.
-
केएल राहुल, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अतिशय दमदार सुरुवात केली. मात्र मधल्या फळीतील फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. (AP)
-
ऋषभ पंत अवघ्या १० धावा करून बाद झाला.
-
यानंतर सूर्यकुमार यादवने १३ धावांचे योगदान दिले.
-
त्याचवेळी अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला खातेही उघडता आले नाही.
-
भुवनेश्वर कुमार १९व्या षटकात सपशेल अपयशी ठरला. या षटकात त्याने एकही विकेट न मिळवता तब्बल १९ धावा दिल्या.
-
गोलंदाजीत भुवनेश्वरची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याने चार षटकात ४० धावा देऊन फक्त एक विकेट मिळवला.
-
कर्णधार रोहित शर्माने ऑल राऊंडर खेळाडूंचा योग्य वापर केला नाही. त्याने हार्दिक पांड्याला चार षटके दिली, मात्र दीपक हुडाला एकही षटक खेळू दिले नाही.
-
जेव्हा मधल्या ओव्हरमध्ये युझवेंद्र चहल नीट खेळात नव्हता तेव्हा रोहित दीपकला दोन ओव्हर देऊ शकला असता.
-
या सामन्यात भारतीय खेळाडूंची फिल्डिंग अतिशय खराब होती. १८व्या षटकात रवी बिश्नोईच्या चेंडूवर अर्शदीप सिंगने कॅच सोडला. ज्याचा फटका भारतीय संघाला बसला. परिणामी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
-
त्याचवेळी, भारतीय संघाच्या गोलंदाजांनी खूप वाइड चेंडू टाकले आणि विरुद्ध संघाला अतिरिक्त धावा देऊ केल्या.
-
प्रकृती अस्वास्थ्यामुळे आवेश खान पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. त्यामुळे कर्णधार रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध तीन फिरकीपटू गोलंदाजांना खेळवावे लागले.
-
यामध्ये युझवेंद्र चहल चांगलाच महागात पडला. त्याने चार षटकांत ४३ धावा देऊन १ बळी घेतला. (सर्व फोटो : ट्विटर)
Video: चांगल्या कर्माचे फळ चांगलेच! काळ आला होता; पण…! गटाराचे उघडे झाकण लावायला गेला अन् चमत्कार झाला, दोन सेकंदांतच…