-
यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेत आज भारत-अफगाणिस्तान यांच्यात लढत होणार आहे.
-
याआधी भारताचा सलग दोन सामन्यांत पराभव झाला आहे. याच कारणामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
-
दरम्यान, भारत आजचा सामना फक्त औपचारिकता म्हणून खेळणार आहे. मात्र असे असले तरी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला या सामन्यात चमकण्याची नामी सधी आहे.
-
तो या सामन्यात तब्बल विक्रम आपल्या नावे नोंदवू शकतो.
-
आशिया चषक स्पर्धेतील सुपर-४ फेरीत ६ सप्टेंबर रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या सामन्यात विराट कोहली खातंदेखील खोलू शकला नाही.
-
मात्र आजच्या सान्यात त्याने चांगली फलंदाजी केली, तर तो तीन विक्रम आपल्या नावे नोंदवू शकतो.
-
यातील पहिला विक्रम म्हणजे, विराट कोहलीने आजच्या सामन्यात ३८ धावा केल्यास त्याच्या टी-२० क्रिकेट सामन्यात त्याच्या ३५०० धावा पूर्ण होतील.
-
रोहित शर्मानंतर अशी कामगिरी करणारा तो दुसरा खेळाडू ठरणार आहे.
-
त्यानंतर विराटने या सामन्यात दोन षटकार लगावताच टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे १०० षटकार पूर्ण होतील.
-
अशी कामगिरी करणारा तो भारतातील दुसरा आणि देशातील दहावा खेळाडू ठरू शकतो.
-
तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५० षटाकर पूर्ण करण्यासाठी विराटला आणखी ३ षटकारांची गरज आहे.
-
भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारे रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, सचिन तेंडुलकर, युवराज सिंह हे खेळाडू आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिन्ही प्रकारात प्रत्येकी २५० पेक्षा जास्त षटकार लगावलेले आहेत.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”