-
सध्या यूएईमध्ये आशिया चषक स्पर्धा खेळवली जात आहे. या स्पर्धेमध्ये भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
-
भारताने पाकिस्तानविरोधातील आपल्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी केली. मात्र सुपर-४ फेरीतील सामन्यात भारतीय संघ आपली कमाल दाखवू शकला नाही.
-
सुपर-४ फेरीमध्ये भारताने पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील आपले दोन्ही सामने गमावले. याच कारणामुळे भारतचे या फेरीतील आव्हान संपुष्टात आले.
-
टीम इंडियाच्या या अपयशामुळे क्रिकेट जगतातील माजी खेळाडू तसेच अन्य दिग्गज विश्लेषक वेगवेगळे कयास लावत आहेत.
-
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा संघनिवड करताना चुकला, असा आरोप केला जात आहे. आघाडीच्या फलंदाजांना सामने खेळू दिले गेले नाही, असेही म्हटले जात आहे.
-
यामध्ये प्रामुख्याने दिनेश कार्तिक, दीपक हुडा, अक्षर पटेल यांची नावे घेतली जात आहेत.
-
अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा जखमी झाल्यामुळे तो स्पर्धेतून बाहेर पडला. त्यानंतर अक्षर पटेलचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. त्याने आशिया चषक सुरू होण्याआधी वेस्ट इंडिज आणि झिंबाब्वे या संघांविरोधात चांगला खेळ केला होता.
-
मात्र सुपर-४ फेरीतील सामन्यांदरम्यान पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील सामन्यात अक्षर पटेलला प्लेइंग ११ मध्ये संधी देण्यात आली नाही.
-
अक्षर पटेल हा उत्तम गोलंदाज आहे. तसेच फलंदाजीमध्ये तो मोठी फटकेबाजी करू शकतो. मात्र आशिया चषक स्पर्धेत त्याला फक्त एका सामन्यात संधी मिळाली.
-
दिनेश कार्तिक हा आघाडीचा फलंदाज असून त्याची फिनिशर म्हणून ओळख आहे. मात्र त्यालादेखील योग्य संधी दिली गेली नाही.
-
सुपर-४ फेरीतील पाकिस्तान आणि श्रीलंकेविरोधातील महत्त्वाच्या सामन्यांत त्याला प्लेइंग ११ च्या बाहेर ठेवण्यात आले. त्याच्या जागेवर ऋषभ पंतला संधी दिली गेली.
-
त्याला जास्त संधी दिली गेली असती तर कदाचित कठीण काळात त्याने चांगली कामगिरी केली असती.
-
आशिया चषक स्पर्धेत दीपक हुडाला दोन सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली. या दोन्ही सामन्यांत त्याने प्रत्येकी १६ आणि ३ धावा केल्या. या सामन्यांत त्याला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले गेले.
-
संघाचा हा प्रयोग सपशेल अपयशी ठरला. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये बहुतांश सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर येऊन चांगली फलंदाजी केलेली आहे.
-
मात्र आशिया चषक स्पर्धेत त्याला सातव्या क्रमांकावर संधी दिल्यामुळे तो खास कामगिरी करू शकलेला नाही.
-
या तीन खेळाडूंना संघात योग्य स्थान मिळाले असते तर कदाचित आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने चांगली कामगिरी केली असती, असे म्हटले जात आहे.

‘उनसे मिली नजर’, गाण्यावर विद्यार्थिनींचा शिक्षकाबरोबर जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स