-
यूएईमध्ये सुरू असलेली आशिया चषक स्पर्धा सध्या अंतिम टप्प्यात आहे. ११ सप्टेंबर रोजी या स्पर्धेतील अंतिम लढत होईल.
-
पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यात ही अंतिम लाढत होणार आहे.
-
आशिया चषक स्पर्धेत भारताने निराशाजनक कामगिरी केली. भारताचे आव्हान सुपर-४ फेरीतच संपुष्टात आले.
-
दरम्यान, या स्पर्धेनंतर भारतीय संघाने आपला मोर्चा आगामी टी-२० विश्वचषकाकडे वळवला आहे.
-
भारतीय संघाकडून या स्पर्धेत चांगली कामगिरी करण्यासाठी योजना आखली जात आहे. तसेच खेळाडू कसून सराव करत आहेत.
-
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची अद्याप घोषणा झालेली नाही. त्यामुळे भारतीय टीममध्ये यावेळी कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
-
या स्पर्धेसाठी भारताच्या आघाडीच्या तीन खेळाडूंची निवड केली जाऊ शकते. उमरान मलिक, शार्दुल ठाकूर तसेच मोहम्मद शमी या खेळाडूंना भारतीय संघात स्थान दिले जाऊ शकते.
-
मोहम्मद शमी हा वेगवान गोलंदाज आहे. हा एक अनुभवी खेळाडू आहे.
-
आयपीएल २०२२ मध्ये खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती.
-
त्यामुळे त्याच्या अनुभवाचा संघाला उपयोग होऊ शकतो.
-
शार्दुल ठाकूरला आशिया चषक स्पर्धेत संधी देण्यात आली नाही.
-
मात्र टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी त्याची संघात निवड केली जाऊ शकते.
-
तो गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागांत चांगली कामगिरी करू शकतो.
-
उमरान मलिक वेगवान गोलंदाज आहे. तो १५० किमी प्रतितासाच्या वेगाने गोलंदाजी करतो. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकासाठी त्याची निवड केली जाऊ शकते.
-
आयपीएल २०२२च्या हंगामात त्याने चांगली कामगिरी करून दाखवली होती.
-
त्यामुळे उमरानला टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी दिली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

महाशिवरात्रीला कुंभ राशीत दुर्मिळ त्रिग्रही योग निर्माण झाल्यामुळे ४ राशी जगतील राजासारखे जीवन! तिजोरीत मावणार नाही धन