-
Asia Cup 2022 Final: एकीकडे देशात बिकट परिस्थिती असताना दुसरीकडे श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने आपल्या देशवासियांना आनंदाचे क्षण उपभोगण्याची संधी दिली. (AP Photo/Anjum Naveed)
-
वानिंदू हसरंगाची (३६ धावा व तीन बळी) अष्टपैलू चमक, डावखुऱ्या भानुका राजपक्षेची (नाबाद ७१) अप्रतिम खेळी आणि प्रमोद मदूशानच्या (चार बळी) भेदक माऱ्याच्या जोरावर श्रीलंकेने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर २३ धावांनी सरशी साधत सहाव्यांदा आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. (AP Photo/Anjum Naveed)
-
दुबई येथे झालेल्या अंतिम सामन्यात श्रीलंकेने दिलेल्या १७१ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव २० षटकांत १४७ धावांत संपुष्टात आला. (AP Photo/Anjum Naveed)
-
त्यांच्याकडून सलामीवीर मोहम्मद रिझवान (४९ चेंडूंत ५५) आणि इफ्तिकार अहमद (३१ चेंडूंत ३२) यांनी संयमाने फलंदाजी केली. (AP Photo/Anjum Naveed)
-
मात्र, मोक्याच्या क्षणी ते बाद झाल्यावर इतरांना फारसे योगदान देता आले नाही. (AP Photo/Anjum Naveed)
-
श्रीलंकेकडून वेगवान गोलंदाज मदूशानने ३४ धावांत चार, तर हसरंगाने २७ धावांत तीन बळी मिळवले. (AP Photo/Anjum Naveed)
-
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेची अडखळती सुरुवात झाली. (AP Photo/Anjum Naveed)
-
त्यांची ५ बाद ५८ अशी स्थिती होती. (AP Photo/Anjum Naveed)
-
मात्र, राजपक्षेने एक बाजू लावून धरताना ४५ चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद ७१ धावांची खेळी केली. (AP Photo/Anjum Naveed)
-
त्याला हसरंगाची (२१ चेंडूंत ३६) उत्तम साथ लाभली. (AP Photo/Anjum Naveed)
-
त्यामुळे श्रीलंकेने २० षटकांत ६ बाद १७० अशी धावसंख्या केली. (AP Photo/Anjum Naveed)
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या ‘या’ कार्यक्रमाला माजी विश्वस्तांकडून विरोध; म्हणाल्या, “चुकीचा पायंडा…”