-
आज संध्याकाळपर्यंत टी२० विश्वचषक २०२२ साठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते. टीम इंडियाच्या निवडकर्त्यांच्या आज दुपारच्या बैठकीत या जागतिक स्पर्धेत कोणत्या खेळाडूंना संधी दिली जावी याचा निर्णय घेतला जाणार आहे. (Photo : AP)
-
या स्पर्धेसाठी जोरदार तयारी सुरु असून, यासाठी एक मजबूत संघ तयार करायचा आहे. जे खेळाडू महत्त्वाच्या क्षणी सामना भारताच्या बाजूने फिरवू शकतील अशा खेळाडूंना या स्पर्धेत संधी दिली जाणार आहे. (Photo : AP)
-
मात्र असेही चार खेळाडू आहेत ज्यांना पहिल्यांदाच टी२० विश्वचषक २०२२ खेळण्याची संधी दिली जाऊ शकते.
-
यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. (File Photo Indian Express)
-
संजू सॅमसन सलामीवीर, मधल्या फळीतील फलंदाज आणि यष्टीरक्षक या तिन्ही भूमिका बजावू शकतो. संजू सॅमसन ज्या पद्धतीने क्लीन सिक्स मारतो, तशी क्षमता फार कमी भारतीय फलंदाजांमध्ये आहे. (File Photo Indian Express)
-
ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्यांवर नजर टाकली तर संजू सॅमसन आणखी सरस ठरू शकतो, कारण बाउन्सर पीचवर संजू सॅमसन जबरदस्त फटकेबाजी करतो. (Indian Express)
-
यंदा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये प्रथमच संधी दिली जाऊ शकते. हर्षल पटेल सुरुवातीच्या आणि शेवटच्या षटकांमधील त्याच्या अत्यंत घातक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. (Instagram : Harshal Patel)
-
हर्षल त्याच्या गोलंदाजीच्या वेगामध्ये सतत बदल करत असतो, तसेच तो गोलंदाजी करताना वेगवेगळे व्हेरिएशन्स वापरतो त्यामुळे तो फलंदाजांसाठी आणखी धोकादायक बनतो. (Photo : PTI)
-
वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगचीही टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये निवड होऊ शकते. डेथ ओव्हर्सच्या गोलंदाजांमध्ये तो निपुण आहे. (Instagram : Arshdeep Singh)
-
ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्ट्या पाहता अर्शदीप सिंगला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियामध्ये स्थान देण्यात येऊ शकते. (Instagram : Arshdeep Singh)
-
अर्शदीप सिंग आलटून पालटून वाइड यॉर्कर टाकण्यात माहिर आहे, ज्यामुळे तो डेथ ओव्हर्समध्ये आणखी धोकादायक गोलंदाज बनतो. (Instagram : Arshdeep Singh)
-
टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये दीपक हुड्डाला संधी दिली जाऊ शकते. दीपक हुडा हा मधल्या फळीतील सर्वात धोकादायक फलंदाजांपैकी एक आहे. (Instagram : Deepak Hooda)
-
गरज भासल्यास दीपक हुड्डा ओपनिंगही करू शकतो. दीपक हुडानेही याच वर्षी जूनमध्ये आयर्लंडविरुद्ध टी-२० शतक झळकावले होते. (Instagram : Deepak Hooda)
-
फलंदाजीसोबतच दीपक हुड्डा उत्कृष्ट ऑफस्पिन गोलंदाजीही करू शकतो. (Instagram : Deepak Hooda)
-
रवींद्र जडेजा दुखापतीमुळे या टी-२० विश्वचषकात खेळणार नाही. अशा परिस्थितीत दीपक हुडा त्याची उणीव भरून काढू शकतो. (Instagram : Deepak Hooda)
![Haldi Ceremony Viral Video](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/02/New-Project-2025-02-06T184910.118.jpg?w=300&h=200&crop=1)
‘त्याला पाहून ती ढसाढसा रडली…’ तिच्या हळदीचा भावनिक क्षण; काळजाला भिडणारा VIDEO एकदा पाहाच