-
भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचे ट्वीटरवर ५० मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले असून इतके फॉलोअर्स असणारा विराट पहिला भारतीय क्रिकेटर आहे.
-
दरम्यान, सोशल मीडियाच्या माध्यमातून विराटला किती कमाई होते, हेच आज जाणून घेऊया.
-
हूपरच्या २०२२ इंस्टाग्राम रिच लिस्टनुसार, विराट कोहली एका इंस्टाग्राम पोस्टसाठी ८.६९ कोटी रुपये घेतो.
-
विराट कोहलीचे ट्विटरवर ५० मिलियन फॉलोअर्स झाले आहे. तर इन्स्टाग्रामवर त्याचे २०० मिलियन पेक्षात अधिक फॉलोअर्स आहे.
-
विराट कोहली २०२० मध्ये ३४ मिलियन फॉलोअर्स असताना प्रति ट्विटसाठी २.५ कोटी रुपये घेत होता.
-
मात्र, कोहलीने आता प्रति ट्विटचे शुल्क दुप्पट केले आहे. तो आता एका ट्वीटसाठी ५ कोटी रुपये घेतो, अशी माहिती आहे.
-
सोशल मीडियावर विराट कोहलीचे एकूण ३०० मिलियनपेक्षा जास्त फॉलोअर्स आहे. यामध्ये ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरचा समावेश आहे.
-
दरम्यान, विराट कोहली गेल्या काही दिवसांपासून फॉर्मशी झगडत होता. मात्र, नुकताच झालेल्या आशिया चषकात त्याने जबरदस्त कामगिरी करत टीकाकारांना उत्तर दिले आहे.
-
सध्या कोहली आगामी विश्वचषकासाठी तयारी करत असून त्यापूर्वी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे.

‘याचा रोल किती हा बोलतो किती?’ संतोष जुवेकर अक्षय खन्नासंदर्भातील ट्रोलिंगबद्दल म्हणाला, “माझं नशीब…”