-
रॉजर फेडररने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. टेनिसप्रेमींची एक अक्खी पिढी घडवणारा फेडररने २४ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर ब्रेक घेतला आहे.
-
४१ वर्षीय फेडरर हा जगातील सर्वात यशस्वी व सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.
-
फेडररने आपल्या कारकीर्दीत एकूण २० ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. राफेल नडाल व नोवाक जोकोविचला मागे टाकत त्याने ८ वेळा विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन व ५ वेळा युएस ओपन व एकदा फ्रेंच ओपन मध्ये विजय मिळवला आहे.
-
२०२१ मध्ये फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टेनिसपटू फेडरर हा सातव्या क्रमांकावर आहे.
-
फेडररची एकूण संपत्ती ५५० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ४३७२ कोटी रुपये आहे. यातील १०३७ कोटी रुपये हे त्याने ग्रँड स्लॅमसारख्या स्पर्धांमधून विजयी होत कमावले आहेत.
-
स्वित्झर्लंडमध्ये फेडररचे आलिशान व अत्यंत सुंदर घर आहे. इतकेच नव्हे तर दुबईमध्ये सुद्धा त्याचा मोठा बंगला आहे.
-
स्वित्झर्लंडच्या ज्युरिख येथील जवळपास दीड एकरात बनवलेल्या घरासाठी फेडररने तब्बल ६५ लाख पौंड खर्च केला होता.
-
फेडररला महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शन मध्ये ६ आलिशान गाड्या आहेत.
-
ऑटोबीजच्या रिपोर्टनुसार, फेडररकडे ५ मर्सिडीज व एक रेंज रोव्हर गाडी आहे.

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”