-
आशिय चषक स्पर्धेत निराशाजनक कामगिरी केल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलिया येथे होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी तयारी करत आहे.
-
याआधी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. याच मालिकेसाठी भारतीय संघ मोहालीमध्ये दाखल झाला आहे.
-
या तीन सामन्यांच्या मालिकेला येत्या २० स्पटेंबरपासून सुरुवात होणार असून पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशन या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
-
दरम्यान, या सामन्याला सुरुवात होण्याच्या दोन दिवस अगोदरच भारतीय टीम मोहालीमध्ये पोहोचली आहे. या मालिकेचा उपयोग टी-२० विश्वचषकासाठीची योजना आखण्यासाठी केला जाणार आहे.
-
विराट कोहली, रोहित शर्मा आणि के. एल. राहुल चंदीगड विमानतळावर दिसले.
-
मागील वर्षी म्हणजेच २०२१ साली यूएईमध्ये टी-२० विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते.
-
२०२१ सालच्या टी-२० विश्वचषकात भारतीय संघाने न्यूझीलंड आणि पाकिस्तानविरोधातील दोन सामने गमावले होते. याच कारणामुळे भारत ग्रुप स्टेजवरच या स्पर्धेतून बाद झाला होता.
-
दुखापतीतून नुकतेच सावरलेले खेळाडूही मोहाली येथे आले आहेत. यामध्ये हर्षल पटेल आहे. जसप्रित बुमराह पत्नी संजना गणेशनसोबत आला आहे.
-
भारताला २००७ नंतर टी-२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावता आलेले नाही.
-
भारताप्रमाणेच ऑस्ट्रेलियासाठीही ही मालिका महत्त्वाची असणार आहे.
-
या मालिकेसाठी ऑस्ट्रलियाच्या ताफ्यात धडाकेबाज खेळाडू टीम डेविड असण्याची शक्यता आहे.
-
भारतीय गोलंदाजांसाठी तो मोठे आव्हान असेल.
-
ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व अरॉन फिंचकडे तर भारताचे रोहित शर्माकडे असेल. (सर्व फोटो-Punjab Cricket Association)
‘पहलगाम हल्ल्यामागे भाजपा सरकारचा हात’, आमदार अमिनूल इस्लाम यांचे वादग्रस्त विधान; आसाम पोलिसांनी केली अटक