-
टी २० विश्वचषक २०२२ स्पर्धेला १६ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरूवात होत आहे.
-
भारतीय संघाचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत आहे.
-
त्याआधी भारत दोन सराव सामनेही खेळणार आहे. रोहित शर्मा भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे.
-
२००७ च्या विश्वचषक जिंकल्यानंतर भारताला आत्तापर्यंत एकही विजेतेपद मिळालेले नाही. त्यामुळे यंदा रोहितवर मोठी जबाबदारी आहे.
-
आत्तापर्यंत टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताच्या जर्सीचा रंग आणि रचना अनेकदा बदलली आहे.
-
२००७ पासून आत्तापर्यंत भारताच्या जर्सीमध्ये किती वेळा आणि कोणकोणता बदल झाला आहे. चला जाणून घेऊयात.
-
पहिला T20 विश्वचषक २००७ मध्ये खेळला गेला होता. २००७ मध्ये टीम इंडियाची एकदिवसीय जर्सी फारशी बदलली नव्हती.
-
त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व महेंद्रसिंग धोनीकडे होते. दक्षिण अफ्रिकेत झालेल्या या स्पर्धेत भारताला विजेतपद मिळाले होते.
-
२००९ मध्ये भारतीय संघाची विश्वचषक जर्सी खूप बदलली. नेव्ही ब्लू जर्सीमध्ये विश्वचषक खेळण्यासाठी पोहोचलेला.
-
मात्र, भारतीय संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. पाकिस्तानने श्रीलंकेचा पराभव करून विजेतेपद पटकावले.
-
२०१० मध्येच टी-२० विश्वचषक स्पर्धेअगोदरही भारतीय संघाच्या जर्सीच्या रंगात थोडा बदल झाला होता.
-
मात्र, या वर्षीही संघ विशेष कामगिरी करु शकला नाही. अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून इंग्लंडने विजेतेपद पटकावले.
-
२०१२ मध्ये आशिया खंडात पहिल्यांदाच टी २० स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीलंकेने यजमानपद भूषवले.
-
१२ संघांदरम्यान खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाची जर्सी जुन्या शैलीत बनवली गेली होती. यावेळीही भारतीय संघाची कामगिरी निराशजनकच राहिली. वेस्ट इंडिजने श्रीलंकेला हरवून विजेतेपद पटकावले.
-
२०१४ मध्येही टी २० विश्वचषक आशियामध्ये झाला आणि यावेळी बांगलादेशला यजमानपद मिळाले.
-
त्या वर्षी भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली. मात्र, अंतिम फेरीत भारताचा पराभव करत श्रीलंकेने विजेतेपत पटकावले.
-
२०१६ च्या टी २० विश्वचषक स्पर्धत धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने चांगली सुरुवात केली होती. यावेळी संघाची जर्सी वनडेच्या जर्सीपेक्षा पूर्णपणे वेगळी दिसत होती.
-
२०१६ च्या टी-२० विश्वचषकात आपल्या धडक कामगिरीमुळे भारत उपांत्य फेरीपर्यंत पोहचला होता. मात्र, उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजने भारताचा पराभव केला.
-
यावर्षी २०२२ साली खेळल्या जाणाऱ्या टी २० वर्ल्डकप पूर्वी भारताने नवीन जर्सी लाँच केली आहे. जर्सीचा फोटो समोर आल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं