-
भारतीय टी२० कर्णधार रोहित शर्मा बोरिवलीत आपल्या आजी- आजोबांसह राहत होता. स्वामी विवेकानंद शाळेतून त्याने १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. क्रिकेटमधील कौशल्यासाठी त्याला शिष्यवृत्तीही देण्यात आली होती.
-
भारतीय टी२० संघाचा उपकर्णधार के. एल राहुल मँगलोरमध्ये शिकला आहे. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने बंगळुरूमधील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता पण त्याने क्रिकेटसाठी शिक्षण अर्धवटच सोडले.
-
धावांचे विक्रम रचणारा विराट कोहलीसुद्धा केवळ १२वी पर्यंतच शिकला आहे. दिल्लीच्या पश्चिम विहार सेवियर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत कोहलीचे शिक्षण झाले आहे.
-
क्रिकेटसह सोशल मीडियावरदेखील चर्चेत असणारा रिषभ पंत याने उत्तराखंडच्या डेहराडूनमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केले तर दिल्लीमध्ये श्री वेंकटेश्वर कॉलेजमधून त्याने कॉमर्स शाखेत पदवी मिळवली आहे.
-
भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या शिक्षणाच्या मैदानात थोडा कमकुवत होता. ९वी मध्ये नापास झाल्यावर त्याने शिक्षण सोडून केवळ क्रिकेटवर लक्ष देण्याचे ठरवले होते
-
भुवनेश्वर कुमार याचे वडील किरण पाल सिंह हे उत्तर प्रदेश पोलीस दलात उच्च पदावर कार्यरत होते. भुवीने १३ व्या वर्षांपासून क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. १२ वी पर्यंतचे शिक्षण घेऊन मग त्याने पूर्णवेळ क्रिकेटला समर्पित केला होता.
-
युज़वेद्र चहल याने महात्मा गांधी कॉलेज ऑफ हेल्थ सायन्समधून पदवी प्राप्त केली आहे. २००९ मध्ये क्रिकेट करिअरची सुरुवात करण्याआधी चहल बुद्धिबळ खेळायचा.
-
दीपक हुड्डाला वयाच्या १४व्या वर्षीच केंद्रीय विद्यालयातून अंडर १७ क्रिकेट संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली होती. दीपकचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत होते.
-
भारतचा हुकुमी एक्का जसप्रीत बुमराह याने अहमदाबाद येथून १२वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले असताना बुमराहचा सांभाळ त्याच्या आईने केला. बुमराहची आई दलजित या एका शाळेत मुख्याध्यापिका होत्या.
-
हर्षल पटेल याने सुद्धा कॉमर्स शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. ८ व्या वर्षांपासून त्याने तारक तिवेदी यांचयाकडे क्रिकेट प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली होती.
-
भारतीय संघातील सर्वात तरुण खेळाडू म्हणजेच अर्शदीप सिंह याने पंजाबमधूनच आपले शिक्षण पूर्ण केले. क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याआधी त्याने पदवी प्राप्त केली.
-
फिरकीपटू रविचंद्रन आश्विन याने तामिळनाडूमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्याने आयटी विषयासह बी. टेकची पदवी पूर्ण केली.
-
अक्षर पटेल याला सुरुवातीपासून मॅकेनिकल इंजिनिअर व्हायचे होते मात्र १५व्या वर्षीच क्रिकेटची गोडी लागल्याने त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेऊनही शिक्षण पूर्ण केले नाही.
-
सूर्यकुमार यादव याने आपले शिक्षण मुंबईतच पूर्ण केले आहे. पिल्लई कॉलेजमधून त्याने बी. कॉमची पदवी प्राप्त केली आहे.
-
दिनेश कार्तिक याचे प्राथमिक शिक्षण कुवेतमध्ये झाले आहे. भारतात आल्यावर त्याने चेन्नईमध्ये आपले शिक्षण पूर्ण केले व तिथेच क्रिकेटचे प्रशिक्षणही घेतले.
‘पारू’ मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्रीची होणार Exit! स्वत: फोटो शेअर करत म्हणाली, “शेवटचा…”