-
जवळजवळ दोन वर्षांच्या शतकांच्या दुष्काळानंतर विराट कोहलीने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत शतकांचा दुष्काळ संपवला.
-
विराटने याच स्पर्धेत आपलं ७१ वं आंतरराष्ट्रीय शतक साजरं केलं.
-
आशिया चषक स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये विराट दुसऱ्या स्थानी राहिला.
-
पाच सामन्यामध्ये दोन अर्धशतकं आणि एका शतकाच्या मदतीने विराटने २७६ धावा केल्या.
-
पुढील महिन्यामध्ये ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमध्ये विराट कोहलीकडून अशाच किंवा याहून अधिक चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे.
-
मागील पर्वामध्ये भारत या स्पर्धेमधून उपांत्यफेरीपूर्वीच बाहेर पडला होता.
-
न्यूझीलंड आणि पाकिस्तानकडून पराभूत झाल्याने भारत स्पर्धेबाहेर फेकला गेला.
-
मात्र २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषक स्पर्धेमधील विजयानंतर भारताला टी-२० चा विश्वचषक जिंकता आला नाही. आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विराटच्या षटकांच्या दुष्काळाप्रमाणे हा दुष्काळही संपवण्याच्या तयारीत आहे.
-
आतापर्यंत टी-२०, एकदिवसीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेट या तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रत्येकी १०० हून अधिक सामने भारताकडून खेळण्याचा अनोखा विक्रम कोहलीच्या नावे आहे.
-
कोहलीने १०४ टी-२० सामने खेळले असून त्यामध्ये त्याच्या फलंदाजीची सरासरी ५१.९४ इतकी आहे.
-
कोहलीने टी-२० मध्ये आतापर्यंत तीन हजार ५८४ धावा केल्या आहेत.
-
१६ ऑक्टोबरपासून सुरु होणारी टी-२० विश्वचषक स्पर्धा आणि त्यामधील संघासंदर्भात चर्चा सुरु असतानाच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केलेलं एक विधान सध्या चर्चेत आहे.
-
“विराट कोहली टी-२० विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर केलं. तो कदाचित इतर फॉरमॅटमधील क्रिकेटमध्ये अधिक काळ खेळण्यासाठी हा निर्णय घेईल,” असं शोएबने म्हटलं आहे.
-
‘इंडिया डॉटकॉम’च्या लाइव्ह टीव्ही सेशनमध्ये शोएबने, “त्याच्या जागी मी असतो तर दूरचा विचार करुन यासंदर्भात निर्णय घेतला असता,” असंही म्हटलं आहे.
-
विराटच्या निवृत्तीबद्दल बोलणार शोएब हा काही पहिला पाकिस्तानी क्रिकेटपटू नाही.
-
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू खेळाडू शाहीद आफ्रिदीनेही विराटने सन्मानपूर्वक निवृत्त व्हावं असं यापूर्वीच म्हटलं आहे.
-
विराटने चांगल्या धावा करताना उत्तम फॉर्ममध्ये असतानाच निवृत्त व्हावं असं विधान आफ्रिदीने केलं होतं. (फोटो सौजन्य : एपी, रॉयटर्स आणि ट्वीटरवरुन साभार)
