-
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टी२० मालिकेसाठी नागपुरात दाखल झाला असून कुठल्याही प्रकारचं दडपण सध्या संघातील खेळाडूंवर नाही आहे हे विराट कोहलीच्या हातातील कॉफीचा मग आणि कानातील इलेक्ट्रॉनिक हेडफोन्स यावर करून कळते आहे. मागच्या सामन्यात कोहली खराब फटका मारून लवकर बाद झाला होता.
-
मोहालीच्या सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली फार काही विशेष चमक दाखवू शकले नाहीत. मात्र हार्दिक पांड्याच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने दोनशेपार मजल मारली होती. त्याने ७१ धावा केल्या होत्या. तशीच खेळी त्याला पुन्हा एकदा उद्याच्या सामन्यात करावी लागणर आहे. तसेच गोलंदाजीतही ऑस्ट्रेलियन संघाच्या फलंदाजांना बाद करावे लागेल. तरच भारत उद्याच्या सामन्यात जिंकू शकेल.
-
सलामीला आलेला भारताचा उपकर्णधार केएल राहुलने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. पण स्थिरावल्यानंतर मात्र त्याला आपली विकेट अशी स्वस्तात देऊन चालणार नाही. त्याने मागील सामन्यात धावा केल्या होत्या.
-
कर्णधार रोहित शर्मासाठी हा खूप मोठा कसोटीचा काळ असणार आहे. आगामी टी२० विश्वचषक २०२२च्या दृष्टीकोनातून विचार करता त्याला आपल्या फलंदाजीसोबत संघालाही पुढे न्यायचे आहे. तसेच गोलंदाजीतील बदल योग्य पद्धतीने हाताळून रागावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.
-
युझवेंद्र चहलला आपल्या फिरकीची जादू दाखवावी लागणार आहे. चेंडू कसा वळवायचा आणि गती कशी कमी करायची जेणेकरून समोरच्या फलंदाज जाळ्यात सापडू शकतो हे सगळ्यात महत्वाचे आहे.
-
अक्षर पटेलला मागच्या सामन्यातील क्षेत्ररक्षणाकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. मागच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर त्याने कॅमेरून ग्रीनचा झेल सोडला होता. ॠषभ पंतच्या बाबतीत बोलायचे झाल्यास त्याला उद्याच्या सामन्यात संधी मिळते का हे पाहणे उत्सुकतेचे असणार आहे.
-
भारतीय संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड हा नागपूरचा जावई आहे. त्याची सासरवाडी ही नागपूरची आहे त्यामुळे त्याला प्रशिक्षक आणि जावई म्हणून देखील भारतीय संघ कसा विजयी होईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. संघात दिनेश कार्तिक ऐवजी ॠषभ पंतला संधी द्यायची का?, गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराहसोबत शेवटच्या षटकात कोण गोलंदाजी करेल याबाबत विचार करावा लागेल.
-
भुवनेश्वरने गेल्या काही सामन्यांतील शेवटच्या षटकांमध्ये खूप धावा दिल्या आहेत. मंगळवारी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी२० मध्ये त्याने १९व्या षटकात १६ धावा दिल्या, मागे आशिया चषकातील पाकिस्तान आणि श्रीलंका याच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात देखील १८ चेंडूत ३५ ते ३६ धावा दिल्या होत्या. त्याला त्याचा फॉर्म परत मिळवून चेंडू स्विंग करण्यावर अधिक भार देणं आवश्यक आहे.
-
छायाचित्रात कार्तिक वगळता दिसत असलेला भारतीय गोलंदाजीचा ताफा हा शेवटपर्यंत तसाच राहील का?, असा चाहत्यांना प्रश्न पडला आहे. उमेश यादवने मागच्या सामन्यात धावा खूप दिल्या. पण बळी देखील महत्वाच्या क्षणी घेतले. हर्षल आपला बोटे फिरवून कशी गोलंदाजी करतो यावर सर्व काही अवलंबून आहे.
-
अनुभवी रविचंद्रन अश्विनला संघात उद्या स्थान मिळेल का हा संघाच्या दृष्टीने महत्त्वाचा एक विषय असणार आहे. कारण चहल हाल खूप धावा देत आहे. पण अश्विन त्याच्या कॅरम चेंडूने गडी बाद करून ऐनवेळी संघाला धावा देखील करून देऊ शकतो.
-
भारताच्या मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादववर माजी खेळाडूंसह सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्याच्या सारख्या ३६० मैदानाच्या कोणत्याही बाजूला तो फटके मारू शकतो. आताच त्याने टी२० मध्ये २००० धावा पूर्ण केल्या आहेत.
-
पारस महांबरे, टी. दिलीप या भारतीय सपोर्ट स्टाफ मध्ये असणाऱ्या साथीदारांची खेळाडूंना जास्त मदत होत असते. शारीरिक आणि मानसिक थकवा दूर करण्यासाठी सपोर्ट स्टाफ अतिशय महत्वाचे काम करतो. या छायाचित्रात विक्रम राठोड नाही आहेत पण ते देखील खेळाडूंना दुखापत होऊ नये आणि सरावा दरम्यान लागणारी सर्व मदत करतात.

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”