-
भारतीय महिला क्रिकेट संघाने दुसऱ्या वनडेत इंग्लंडचा पराभव करून इतिहास रचला आहे. तसेच एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना जिंकून मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. या विजयात ‘स्विंग क्वीन’ बनलेल्या रेणुका ठाकूरचे मोलाचे योगदान आहे.
-
रेणुका ठाकूरने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १० षटके टाकत ५७ धावा देत आणि चार गडी बाद केले. आपल्या स्विंग गोलंदाजीमुळे रेणुकाने यजमान संघाच्या फलंदाजांची पॅव्हेलियनचा रस्ता दाखला.
-
रेणुकाने प्रथम सोफिया डंकलीला इनस्विंग बॉलवर बोल्ड केले. यानंतर एम्मा लॅम्बरही एलबीडब्ल्यू आऊट झाली.
-
इंग्लंडकडून सर्वाधिक (६५) धावा करणाऱ्या डॅनियल वॅटलाही रेणुकाने यॉर्करवर आऊट केले. तर सोफी एक्लेस्टन तिचा चौथा बळी ठरली.
-
रेणुकाने गेल्या वर्षी जुलैमध्ये एकदिवसीय संघात पदार्पण केले होते. तेव्हापासून तिने जवळपास प्रत्येक मोठ्या संघाविरुद्ध चांगली कामगिरी केली आहे.
-
आपल्या स्विंगच्या जोरावर तिने अनेक फलंदाजांना पाणी पाजले आहे. तिच्या स्विंगची जादू कॉमनवेल्थ गेम्समध्येही दिसली होती. या स्पर्धेत तिने सर्वाधिक विकेट घेतल्या होत्या.
-
रेणुकाने आपल्या आयुष्यात खेळासाठी जे काही त्याग केले, त्याचे फळ तिला मिळत आहे.
-
यशाचा हा प्रवास रेणुकासाठी सोपा नव्हता. तीन वर्षांची असताना तिच्या वडिलांचे निधन झाले. रेणुकाच्या वडिलांना क्रिकेटची आवड होती.
-
रेणुकाने वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी क्रिकेट खेळण्यासाठी आपले घर आणि कुटुंब सोडले आणि धर्मशाला येथे सराव सुरू केला होता. तिथूनच तिने तिच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरूवात केली होती.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं