-
टेनिस या खेळामधील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररने या खेळाला अखेरचा निरोप दिला आहे.
-
यावेळी तो अतिशय भावुक झालेला पाहायला मिळाला.
-
टेनिसचा GOAT (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) म्हटल्या जाणाऱ्या रॉजर फेडररने भरल्या डोळ्यांनी या खेळाला निरोप दिला.
-
शुक्रवार २३ सप्टेंबरला फेडररने त्याच्या या प्रवासातील शेवटचा सामना खेळला.
-
या सामन्यात तो पराभूत झाला असला तरीही, हा पराभव त्या २० ग्रँडस्लॅम विजेतेपदांसमोर काहीच नव्हता.
-
अनेकांसाठी टेनिस म्हणजे फेडरर. कदाचित त्याचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आणि मित्र राफेल नदालसाठीही.
-
त्यामुळे आपल्या प्रवासाबद्दल बोलताना फेडरर भावूक झाला तेव्हा नदाललाही अश्रू अनावर झाले.
-
तुमचा सर्वात मोठा स्पर्धक तुमच्या निरोपावर रडला, असे क्वचितच पाहायला मिळते.
-
विशेषत: जेव्हा तुम्ही गेल्यावर एक नंबरची खुर्ची त्याच्यासाठी रिकामी झालेली असते.
-
पण, नदाल रडला आणि तमाम टेनिस चाहत्यांनाही रडवलं.
-
कदाचित हीच गोष्ट या दोन खेळाडूंना महान बनवते.
-
स्वित्झर्लंडचा स्टार टेनिसपटू रॉजर फेडररने नुकतीच निवृत्ती जाहीर केली.
-
४१ वर्षीय फेडररने शुक्रवारी, २३ सप्टेंबरला अखेरचा सामना खेळला.
-
फेडररने हा सामना दुहेरीत खेळला. यामध्ये त्याचा जोडीदार स्पॅनिश टेनिस स्टार राफेल नदाल होता.
-
मात्र, लंडनमध्ये खेळलेल्या रॉजर फेडररला त्याच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना जिंकता आला नाही.
-
अमेरिकेच्या फ्रान्सिस टियाफो आणि जॅक सॉक यांच्या विरुद्ध फेडरर आणि नदाल यांचा ४-६, ७-६(२), ११-९ असा पराभव झाला.
-
सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये फेडररच्या शेवटच्या सामन्यानंतर त्याच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे स्पष्ट दिसत आहे.
-
यावेळी तो रडताना आणि हुंदके देताना दिसला.
-
यादरम्यान नदालशिवाय सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविचही त्याच्यासोबत दिसला. यासोबतच अनेक स्टार खेळाडूही उपस्थित होते.
-
फेडररने या सर्वांना मिठी मारली आणि भरल्या डोळ्यांनी टेनिसला निरोप दिला.
-
(सर्व फोटो : ट्विटर – @LaverCup)

उन्हाळ्यात कलिंगड खाण्यापूर्वी हा व्हिडिओ पाहा! रंगाचे इंजेक्शन दिलेले कलिंगड कसे ओळखावे? काकुंनी सांगितला सोपा जुगाड