-
भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली.
-
या मालिकेतील भारत-विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताची गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडच्या फलंदाजाला ‘मंकडिंग’च्या मदतीने धावचित करत भारताला सामना जिंकून दिला.
-
या अटीतटीच्या लढतीत दिप्ती शर्माने क्रिकेटमधील बदललेल्या नियमांचा उपयोग करत इंग्लंडच्या शार्लोट डीनला बाद केल्यामुळे जगभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
-
तर दुसरीकडे दिप्ती शर्माने मिळवलेल्या या बळीमुळे भारतीय पुरुष क्रिकेट संघातील फिरकीपटू आर. अश्विन चर्चेत आला आहे.
-
भारताने विजयासाठी दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता.
-
इंग्लंडकडे फक्त शेवटचा गडी शिल्लक असताना शार्लोट डीन ही एकमेव फलंदाज किल्ला लढवत होती.
-
मात्र ४३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला.
-
चेंडू टाकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडले आणि दिप्तीने तिला धावबाद केले. यापूर्वी फलंदाजाला अशा पद्धतीने बाद करणे खेळभावनेविरोधी असल्याचे म्हटले जायचे.
-
याच कारणामुळे अनेक गोलंदाज फलंदाजाला मंकडिंगच्या मदतीने बाद करणे योग्य नसल्याचे समजत असत.
-
मात्र आता अशा पद्धतीने गोलंदाजाने फलंदाजाला बाद केल्यास ते धावचित म्हणून गृहीत धरले जाते.
-
याच बदललेल्या नियमाचा फायदा घेत दिप्तीने शार्लोटला बाद केले आणि भारताला विजय मिळवून दिला.
-
दिप्तीने दाखवलेल्या या हुशारीनंतर जगभरातून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.
-
अनेकांनी दिप्ती तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाला पाठिंबा दिला.
-
तर काहींनी नियमानुसार इंग्लंडची खेळाडू बाद झालेली असली तर दिप्ती शर्माने जे केले त्याला क्रिकेट म्हणत नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.
-
भारतीय पुरुष संघातील फिरकीपटू आर अश्विनने मात्र दिप्ती शर्माला पाठिंबा दिला आहे.
-
दिप्ती शर्माला त्याने क्रिटेटमधील हिरो म्हटले आहे. याआधी आर अश्विनने आयपीएल २०१९ मध्ये मंकडिंगच्या माध्यमातून राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजाला बाद केले होते.
-
यावेळी तो पंजाब संघाचा कर्णधार होता. त्याने ६९ धावांवर खेळत असलेल्या तसोच नॉन स्ट्राईकवर असलेल्या जोस बटलरला बाद केले होते. अश्विनने केलेल्या मंकडिंगमुळे त्याच्यावर चांगलीच टीका झाली होती.
-
यावेळी दिप्ती शर्माने अश्विनची पुनरावृत्ती केली आणि अशिन चर्चेत आला. (सर्व फोटो ट्विटरवरून साभार)
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं