-
न्यूझीलंडचा सलामीवीर आणि टी२० क्रिकेटमधील आघाडी फलंदाज मार्टिन गप्टिलने लॉरा मॅकगोल्डरिकशी विवाह केला आहे. २०१४ मध्ये मॅक्गोल्डरिकसोबत लग्न केले होते. ती एक प्रसिद्ध निवेदक असून सध्या ती पहिले स्काय स्पोर्ट्सवर काम करत होती.
-
ऑस्ट्रेलियन अष्टपैलू बेन कटिंगने क्रीडा सूत्रसंचालक एरिन हॉलंडशी लग्न केले आहे. कटिंगने व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी १३ फेब्रुवारी २०२१ रोजी हॉलंडशी लग्न केले. ती सध्या त्याच देशातील वेगवेगळ्या खेळांच्या आयोजनाचे निवेदक म्हणून कार्यरत आहे.
-
ऑस्ट्रेलिया आणि चेन्नई सुपर किंग्जचा माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनने २०१० साली ली फर्लाँगसोबत लग्न केले. वॉटसन रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत ऑस्ट्रेलिया लीजेंड्स संघाचा कर्णधार होता. तिने सुद्धा महिला हॉकी ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय चषकचे निवेदन केले होते. ऑस्ट्रेलिया मध्ये तो देशांतर्गत राष्ट्रीय चषक दर दोन वर्षांनी होत असतो.
-
टीम इंडियाची शान असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याची पत्नी ही एक प्रसिद्ध टीव्ही शो स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे. बुमराह आणि संजनाचे २०२१ मध्ये गोव्यात लग्न झाले होते. भारताची स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशन ही सध्या स्टार स्पोर्ट्सवर काम करते.
-
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू स्टुअर्ट बिन्नीने २०१२ मध्ये मयंती लँगरशी लग्न केले. या जोडप्याला सध्या एक मूल आहे आणि स्टुअर्ट बिन्नी अलीकडेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज सीझन २ मध्ये खेळताना दिसला. त्याची पत्नीने आशिया चषकावेळी स्टार स्पोर्ट्सवर स्पोर्ट्स प्रेझेंटर म्हणून काम केले.
-
दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज मॉर्ने मॉर्केलने ऑक्टोबर २०१३ मध्ये ऑस्ट्रेलियन टीव्ही प्रेझेंटर रोझ केलीला प्रपोज केले आणि डिसेंबर २०१४ मध्ये त्यादोघांचे लग्न झाले. या जोडप्याला सध्या दोन मुले आहेत.
होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती