-
टी२० विश्वचषकाला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. प्रत्येक संघ मजबूत तयारीनीशी ऑस्ट्रेलियात पोहोचत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी पहाटे टी२० विश्वचषकासाठी रवाना झाला. या फोटोत विराट कोहलीसह हर्षल पटेल आणि युझवेंद्र चहल यांनी एकत्र येत सेल्फी काढला.
-
दुसऱ्या छायाचित्रात कर्णधार रोहित शर्मासह मधल्या फळीतील सुर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक आणि ऋषभ पंत यांचा एकत्रित फोटो शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि कर्मचारी सूट-बूटमध्ये दिसत आहेत.
-
भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनीही एकत्र येत फोटो काढला आहे. हा फोटो त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बुमराहच्या बदलीची घोषणा अद्याप केली नाही त्यामुळे अनुभवी हार्दिक पांड्यावरच फलंदाजीबरोबर गोलंदाजीची देखील मोठी जबाबदारी आहे.
-
रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ गुरुवारी पहाटे टी२० विश्वचषकासाठी रवाना झाला. बीसीसीआयने टीम इंडियाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघाचे १४ खेळाडू उभे आहेत.
-
रविंद्र जडेजा या टी२० विश्वचषकामध्ये खेळणार नसल्याने भारतीय संघाकडे फक्त हार्दिक पांड्याकडे पहिले जात आहे. संध्या तो फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारताचे निम्मी डोकेदुखी कमी झाली आहे. पण गोलंदाजीत मात्र भारताला लवकरच काहीतरी निर्णय घेणे गरजेचे आहे.
-
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जारी केलेल्या या फोटोमध्ये कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह संघाचे १४ खेळाडू डाव्या बाजूला, तर प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संघाचा इतर सपोर्ट स्टाफ उजवीकडे उभे आहेत. बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का?. विश्वचषकाला निघालेल्या टीम इंडियामध्ये खेळाडू कमी आणि सपोर्ट स्टाफ जास्त दिसत आहेत.
-
ॠषभ पंतचा स्वॅगचं वेगळा आहे. नुकताच त्याचा दसऱ्याआधी वाढदिवस साजरा झाला. पण तो अजूनही पूर्ण क्षमतेने खेळताना दिसत नाही. रोहित शर्माची पहिली पसंती ही दिनेश कार्तिकलाच असेल हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या मालिकेतून कळले आहे. त्यामुळे विश्वचषकात कितपत संधी मिळेल हे येणारा काळच सांगू शकेल.
-
टीम इंडियाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीला कोरोनाची लागण झाली होती. परंतु आता फिटनेस टेस्ट यशस्वीरित्या पार केल्यानंतरच तो ऑस्ट्रेलियाला रवाना होऊ शकतो. त्यामुळे आता सर्व जबाबदारी ही भारताचे हे दोन वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग आणि शमीवर आली आहे. त्याने आशिया चषक आणि दक्षिण आफ्रिकेच्या टी२० मालिकेत चांगली कामगिरी केली. तशीच कामगिरी त्याला ऑस्ट्रेलियात करायची आहे.
-
आर. अश्विनला आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत एकही गडी बाद करता आला नाही त्यामुळे चहल आणि अक्षर पटेल यांनाच अंतिम अकरामध्ये स्थान मिळू शकते. श्रेयस अय्यर, दीपक चहर, रवी बिश्नोई आणि मोहम्मद शमी हे स्टँडबाय खेळाडू आहेत. यापैकी श्रेयस, रवी आणि दीपक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळत आहेत. या एकदिवसीय मालिकेनंतरच तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियाला रवाना होतील.

५० वर्षांनंतर गुरुच्या राशीमध्ये निर्माण होईल मालव्य आणि लक्ष्मी नारायण राजयोग! या ३ राशीच्या लोकांना मिळेल अपार पैसा आणि पद प्रतिष्ठा