-
२००७ पासून ते २०२१ पर्यंतच्या टी२० विश्वचषकामध्ये खेळणारा रोहित शर्मा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तो आता भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित टी२० विश्वचषकात ३० डावांत ८४७ धावा करणारा सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. सरासरी ३८.५०च्या धावगतीने त्याने विरोधी संघाला हैराण करून सोडले आहे, ७९* ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यात ६ अर्धशतकांचा समावेश आहे.
-
टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला २०१४ आणि २०१६ च्या टी२० विश्वचषकमध्ये दोनवेळा मालिकावीराचा पुरस्कार मिळाला आहे. टी२० विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून त्याचे नाव घेतले जाऊ शकते. विराटने विश्वचषक स्पर्धेत १९ डावांत ७६.८१ च्या विस्मयकारक सरासरीने ८४५ धावा केल्या आहेत. भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू म्हणून तो रोहित शर्माला मागे टाकतो का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. यात १० अर्धशतकांचा समावेश आहे. नाबाद ८९ ही सर्वोत्तम खेळी आहे.
-
भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने २००७ च्या टी२० विश्वचषकात भारताला विश्वचषक जिंकण्यात मोलाचे योगदान दिले. या डावखुऱ्या फलंदाजाने काही महत्त्वपूर्ण खेळी खेळल्या. स्टुअर्ट ब्रॉडला मारलेले ते एकाच षटकातील सहा षटकार आजही कोणी विसरू शकत नाही. इंग्लंडविरुद्ध सर्वात वेगवान ५० धावा काढण्याचा विक्रमही त्याच्या नावावर आहे. या फलंदाजाने २८ डावांमध्ये २३.७२ च्या सरासरीने ५९३ धावा केल्या आहेत. यात ४ अर्धशतकांचा समावेश आहे.
-
टी२० विश्वचषक जिंकणारा महेंदसिंग धोनी हा पहिला कर्णधार आहे. भारताला त्याने क्रिकेटमधील सर्व प्रकारात एका उंचीवर नेऊन ठेवले. आयसीसीचे तीन महत्वाचे चषक त्याने जिंकून दिले आहेत. त्याचबरोबर धोनीने त्याच्या बॅटनेही चांगली कामगिरी केली आहे. फलंदाजीला सर्वात खाली येत त्याने फिनिशरची भूमिका निभावली आहे. आतापर्यंतच्या २९ डावात ३५.२६ च्या सरासरीने ५२९ धावा केल्या आहेत.
-
गौतम गंभीरने पाकिस्तानविरुद्ध ७५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळून भारताला संघर्षपूर्ण धावसंख्या गाठण्यास मदत केली. २००७ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात त्याचे योगदान हे मोलाचे आहे. सेहवागसोबत नेहमीच सलामीला भारताला उत्तम सुरुवात करून दिली होती. या फलंदाजाने २० डावात २६.२० च्या सरासरीने ५२४ धावा केल्या आहेत.
-
आणखी एक भारताचा डावखुरा फलंदाज सुरेश रैना विश्वचषकात २००९ ते २०१६ या कालावधीत मधल्या फळीत दिलेले योगदान भारत कधीच विसरू शकणार नाही. त्याने एकूण ४५३ धावा केल्या आहेत. यात एका शतकाचा समावेश आहे.
-
भारताचा माजी सलामीवीर धडाकेबाज वीरेद्र सेहवागने नेहमीच भारताला आक्रमक सुरुवात करून दिली आहे. गौतम गंभीरच्या साथीने त्याने महत्त्वपूर्ण भागिदाऱ्या टीम इंडियाला करून¬¬¬ दिल्या आहेत. त्याने एकूण १८७ धावा केल्या आहेत. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
-
टीम इंडियाच्या ताफ्यातील अजून एक माजी फलंदाज युसुफ पठाण याने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम सामन्यात सलामीला येत आक्रमक फलंदाजी केली होती. तो भारतीय संघात २००७ ते २०१० या कालावधीत होता. त्याने एकूण १२२ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर कधी-कधी फिरकी गोलंदाजीही केली आहे.
-
भारतीय संघाचा आणखी एक मधल्याफळीतील फलंदाज रॉबिन उथप्पा याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य सामन्यात युवराज सिंगच्या साथीने उत्कृष्ट अशी भागीदारी केली होती. तो २००७ च्या एकमेव विश्वचषकामध्ये खेळला आहे. त्यात त्याने ६ सामन्यात त्याने ११३ धावा केल्या, यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.
Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं