-
भारतात क्रिकेटपटू आणि बॉलिवूड यांच्या नात्याबद्दल वेगळ बोलायची आवश्यकता नाही. बऱ्याच क्रिकेटपटूंच्या पत्नी एकतर अभिनेत्री आहेत. किंवा बॉलिवूडशी संबंधित आहेत. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा पाच क्रिकेटपटूंची नावे सांगणार आहोत. ज्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.
-
भारताचे माजी फलंदाज आणि १९८७ विश्वचषक संघाचे सदस्य संदीप पाटील यांनी १९८५ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री पुनम ढीलोई यांच्याबरोबर ‘कभी अजनबी थे’ या चित्रपटात काम केले आहे.
-
भारतीय क्रिकेट संघातील माजी ऑलरॉऊंडर सलीम धुरांनी यांनीही अभिनेत्री प्रवीण बाबी सहकलाकार असलेल्या ‘चरित्र’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली होती.
-
भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज आणि १९८७ च्या विश्वचषक संघाचे सदस्य सुनील गावसकर यांनीही ‘प्रेमाची सावली’ या मराठी चित्रपटात काम केले आहे.
-
माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यांनीही सेलीना जेटली सहकलाकार असलेल्या ‘खेल’ या चित्रपटात अभिनय केला आहे. हा चित्रपट २००३ मध्ये प्रकाशित झाला होता.
-
भारताचा सलामीवर फलंदाज शिखर धवन ही त्यांच्या आगामी चित्रपटात काम करण्यासाठी सज्ज आहे. ‘डबल एक्स एल’ हा त्याचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ह्यूमा कुरेशी आणि सोनाक्षी सिन्हा यांचीही या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे.

Champions Trophy: “हे फारच चुकीचं होतं…”, डेव्हिड मिलरने आफ्रिकेच्या पराभवाचं खापर ICCवर फोडलं, सामन्यानंतर दुबईला जाण्यावरून सुनावलं